🌹 *भावपूर्ण श्रद्धांजली*
संगीत क्षेत्रातील भल्याभल्यांना हेलाऊन टाकणारा धृवतारा, ज्यांनी आपला वेगळा ठस्सा उमटवला,
असे अजोड, अविस्मरणीय व्यक्तीमत्व, वसंतबहार, ख्यातनाम, त्रिवार वंदनीय प.पुज्य पंडीत *वसंतरावजी श्रीभाते* सरांनी
२४ डिसेंबर २०२० रोजीच्या रात्री जवळपास ०८:३० वाजताचे दरम्यान देह ठेऊन विश्वाचा निरोप घेतला.
मराठवाड्याचे वैभव संबोधल्या गेलेले संगीत रजनीचे माहेरघर आणि संगीताचीखाण असलेल्या बोधडी बु.स्थित अंधविद्यालयाचे
सेवानिवृत्त गुरुवर्य वसंतरावांना वयाच्या ७५ व्या वर्षी ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यांची
प्राणज्योत मालवल्याने वसंतरावांच्या स्वरवसंताची पोकळी कायमची भरुन न निघणारी आहे.
स्वर्गीय गुरुवर्यांच्या गुरुकिल्लीतून शेकडो शिष्य उत्तमोत्तमरित्या घडलेत.
बोधडीतील पांचाळ सर असतील, ठाकरे सर त्यांचेच शिष्य अाहेत मात्र स्वरभास्कर वंदनीय श्रीभातेसरांची जागा घेऊ शकणार नाहीत.
अशा थोर व्यक्तीमत्वाला त्यांचे कुटूंब, त्यांचे शिष्य,
त्यांचे चाहते प्रत्यक्ष भेटीला कायमचे मुकले आहेत. परंतु संगीताच्या रुपाने मात्र गुरुवर्यांच्या सानिध्यात आम्ही निरंतर राहणार आहोत.
अशा थोरांची थोरवी लिहायला शब्द अपुरे पडतील हे वास्तव आहे. हे दोन शब्द टिपतांना आश्रू अनावर झालेत, असो.
२५ डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थीवावर बोधडी बु. येथे अंत्यविधी सोहळा पार पडणार अाहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो, हिच परमात्म्यास प्रार्थना !
श्रीभाते परिवाराच्या दु:खात पत्रकार बी.एल.कागणे किनवट यांचा परिवार सहभागी आहे.
🌹श्रद्धांजली ! 🌹🌹श्रद्धांजली !! 🌹🌹🌹 भावपूर्ण श्रद्धांजली !!!