किनवट चिखली येथील मनसेचे झुंजार कार्यकर्ते शेख अझरुद्दीन शेख शेफी यांच्या कार्याची दखल घेत
मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोंटी सिंग जहागीरदार यांच्या
आदेशानुसार ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड यांनी
शेख अझरोद्दीन यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) पदी नियुक्ती केली
असून या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
किनवट तालुक्यातील मौजे चिखली बुद्रुक
येथील रहिवासी असलेले शेख अझरोद्दीन शेख शफी हे गेल्या अनेक वर्षांपासून मनसेत प्रामाणिकपणे काम करतात.
पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांना प्रभावित होऊन त्यांनी किनवट तालुक्यात पक्षवाढीसाठी अथक परिश्रम घेतले.
पक्षाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील मुस्लिम समाजासह वाहतूकदारांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला.
त्यांच्या या कार्याची पक्षाने दखल घेतली असून मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांच्या आदेशानुसार ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवि राठोड व
वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड यांनी शेख अझरोद्दीन शेख शफी यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नांदेड जिल्हा
उपाध्यक्ष (ग्रामीण )पदी नियुक्ती केली असून सारखाणी येथे पक्षाच्या बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वजाती समूहातील मराठी माणसासाठी संघर्ष
करणारे एकमेव नेते आहेत त्यामुळेच मी त्यांच्या पक्षात एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलो. माझ्यासारख्या सामान्य मुस्लिम
कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठीने मला जिल्हास्तरावर काम करण्याची संधी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखविला तो विश्वास मी
निश्चितपणे सार्थ ठरविणे. जिल्हाध्यक्ष मोंटीसिंग जागीरदार, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड,
वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड, किनवट तालुकाध्यक्ष अमोल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात नांदेड
जिल्ह्यातील वाहतूकदारांचे प्रश्न मार्गी लावू पक्षाला घराघरात पोहोचविण्याचे काम करू
अशा प्रतिक्रिया शेख अझरोद्दीन यांनी नियुक्तीनंतर दिल्या आहेत.
या नियुक्तीबद्दल मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शेख असिफ, माहूर तालुका सचिव प्रवीण जाधव,
माहूर तालुका उपाध्यक्ष सागर कन्नव,मनविसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद भंडारे, किनवट शहर
उपाध्यक्ष इलियास चौधरी, मनविसेचे किनवट शहराध्यक्ष नागेश मंत्रीवार, नरेंद्र राठोड, नारायण
पवार, राजू पवार, कुवरसिंह राठोड, शेख बिलाल यांच्याकडून शेख अझरोद्दीन शेख शफी यांचे अभिनंदन होत आहे.