Ticker

6/recent/ticker-posts

६ डिसेंबर १९५६ ची पाहाट उगवली, पण सूर्य जणू अस्ताला गेला होता, युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी, करोडोंचा कैवारी,


६ डिसेंबर १९५६ ची पाहाट उगवली, पण सूर्य जणू अस्ताला गेला होता, युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी, करोडोंचा कैवारी,

 या देशाचा सच्चा देशभक्त या देशाला सोडून गेला,

 वाऱ्यासारखी  बातमी साऱ्या देशभर पसरली, 

दिनांचा वाली आता राहिला नाही, त्या दिवशी एकाही घराची चूल पेटवली गेली नाही, 

जी सापडेल त्या साधनांनी लोकांनी मुंबईला धाव घेतली रेल्वेमध्ये पाय ठेवायला जागा नाही अश्या स्थितीतही लोक मुंबईला येत होते,

 प्रत्तेक जण रडत होता, कोणी माझा बाप गेला तर कोणी माझी आई गेली म्हणून अकरंदन करत होते, 

अरबी समुद्राला जणू काही त्या दिवशी या निळ्या पाखरांच्या अश्रूंचाच पूर आला होता, 

चंदनाच्या सुगंधी लाकडांवर बाबांचा देह ठेवला गेला, 

बाबांच्या चितेतील एक एक ठिणगीही जणू प्रत्येकाला संदेश देत होती, 

की "बाळांनो रडू नका, मी हा समतेचा गाडा इथवर आणला आहे याला पुढे नेता आला तर 

न्या पण मागे मात्र आणू नका,शिका, संघटित व्हा, अन संघर्ष करा". 
प्रज्ञेच्या महामेरूला हृदयाच्या देठापासून विनम्र अभिवादन...!

#जयभीम !!