*दिव्यांगाना देण्यात येणार्या निधी वाटपात माळकोलारी ग्रामसेवका द्वारे कसूर*
किनवट( तालुका प्रतिनिधी)
निसर्गाने त्याची निर्मिती करत असताना कसूर केल्याने दिव्यांग होतो किंवा अपघाताने दिव्यांग निर्माण होतो.
त्याचे जगणे सुसह्य व प्रतिष्ठेचे व्हावे यासाठी शासन काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करते परंतु, त्या मदतीचे वाटप
न करणे म्हणजे "स्वयंपाक तयार आहे, व वाडेकरू पळून गेला" अशाच म्हणीप्रमाणे माळकोलारी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे घटना घडली.
म्हणजे दिनांक 14 /12 /2020 रोजी श्री राजू माहुरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी
पंचायत समिती जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे तक्रार अथवा माहिती दिली होती की
ग्रामपंचायतीने दिव्यांग लाभार्थी अनुदान वाटप न करता 41 हजार 216/- रुपये शिल्लक ठेवून ग्रामसेवक साहेबांनी कर्तव्यात कसूर
केल्याप्रकरणी चौकशी करून ग्रामसेवक निलंबित करणे अन्यथा पंचायत समिती
कार्यालयासमोर समोर उपोषण करणार असल्याबाबतची माहिती दिली होती
म्हणून दिनांक 15 /12 /2020 रोजी कर्तव्यदक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी गटविकास अधिकारी पंचायत
समिती किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड यांना सदर माहिती देणार राजू माहुरकर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून निवेदनातील
मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करून नियमानुसार दोस्ती व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करावी असे आदेशित केले आहे.