Ticker

6/recent/ticker-posts

किनवट टुडे न्यूज चे संपादक संपादक आनंद भालेराव यांना वच्‍छलाबाई अपंग सेवा संस्था मुंबई महाराष्ट्र च्या वतीने covid-19 कर्म योद्धा "करोना वारियर्स" सन्मानपत्राने सन्मानित


किनवट टुडे न्यूज चे संपादक संपादक आनंद भालेराव यांना   वच्‍छलाबाई अपंग सेवा संस्था मुंबई महाराष्ट्र च्या वतीने covid-19 कर्म योद्धा  "करोना वारियर्स" सन्मानपत्राने सन्मानित

किनवट ता.प्रतिनिधी:  वच्‍छलाबाई अपंग सेवा संस्था मुंबई महाराष्ट्र च्या वतीने "covid-19 कर्म योद्धा"  "करोना वारियर्स" सन्मानपत्र किनवट टुडे 

न्यूज चे संपादक संपादक श्री आनंद भालेराव यांना किनवटचे अखिल भारतीय अपंग कामगार 

संघटना चे तालुका सचिव राज माहुरकर,  शहराध्यक्ष सलाम बागवान, 

किनवट संघटना अध्यक्ष गजानन कोतपेल्‍लीवार  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

कोरोना काळामध्ये अपंगाच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य 'किनवट टुडे न्यूज' च्या माध्यमातून संपादक श्री आनंद भालेराव  यांनी केले

. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना "covid- 19  कर्म योद्धा 

"कोरोना वारियर्स" सन्मानपत्र संस्थेचे अध्यक्ष अरुण गव्हाणे यांच्या सहीने प्रदान करण्यात आले . गंभीर covid-19 च्या अपदा काळात 

आपण स्वतःच्या  आयुष्याची काळजी न करता सर्वसामान्य नागरिकांचे जनजागृती करिता त्यांची गरज पूर्ण करत त्यांच्या सुरक्षेसाठी 

निर्भीडपणेअहोरात्र केलेल्या समाज कार्याबद्दल आपणास डिजिटल "कोविड19 कर्म योद्धा" कोरोना वारियर्स"सन्मानपत्र प्रदान करीत करण्यात येत आहे. 


या बद्दल आपले अभिनंदन व आपण केलेल्या सेवेसाठी शतशः आभार ! असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
       


 संपादक श्री आनंद भालेराव यांच्यावर त्यांच्या मित्रमंडळी कडून व चाहत्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.