किनवट ता प्र दि 22 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर राज्यात व देशात ताळेबंद जाहीर करण्यात आले त्याकाळा नंतर म्हणजे मार्च 2020 नंतर प्रथमच किनवट नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती
जी एका टेंडरच्या विषयावरून वादळी ठरली तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.
शहरातील मागील अनेक महिन्यापासून प्रलंबित विषयाकरिता व नवीन नगर परिषद प्रशासकीय
इमारतीच्या फर्निचर व वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या मजुरी करिता अत्यंत महत्वाची अशी आजची सभा होती
जिच्या कडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले होते
परंतु ज्या प्रमाणे विद्यमान सदस्यांनी निवडून आल्यापासून आज पर्यंत नागरिकांचा हिरमोड केलेला आहे
त्याच प्रमाणे नवीन प्रशासकीय इमारतिमध्ये आयोजित पहिल्या सभेत पोलिसांना बोलावण्याची नामुष्की ओढावली गेली आहे .
नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या सभेत मुख्याधिकारी निलेश सूनकेवार व नगर परिषद कर्मचारी हे प्रशासना कडून होते तर
यावेळी सर्व नगरसेवक व नगरसेविकांची उपस्थिती होती. सुरवातीला शांततेत सुरू झालेल्या
सभेत नवीन प्रसकीय इमारतीच्या फर्निचर टेंडर प्रक्रियेचा विषय आल्यावर नगरसेवक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले
तर मुख्याधिकारी निलेश सूनकेवार यांच्या दिशेने काही नगरसेवक धावताना दिसले
तर काहींनी खुर्च्या फेकल्याने सभास्थळी
पोलिसांना पाचारण करावे लागले तर सर्व विषयांना या गोंधळातच मंजुरी देण्यात आली.
आता भाजप च्या नगरसेवक व नगरसेविकांची अशा वर्तवणुकीमुळे आ भीमराव केराम तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक व