किनवट( प्रतिनिधी)
शनिवारपेठे येथील झुंजार कार्यकर्ते वसंत राठोड यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या किनवट तालुका युवा सचिवपदी नियुक्ती झाली
असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सोमेश्वर देवस्थान जवळील
शनिवारपेठ येथील रहिवासी वसंत वामनराव राठोड हे एक कार्यकर्ता म्हणून गोरगरीबांच्या हितासाठी काम करतात.
सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची या भागात ओळख आहे. दरम्यान त्यांच्या या कार्याची दखल घेऊन
प्रहार पक्षाच्या किनवट तालुका युवा सचिव पदी नियुक्ती केली
असून दिनांक 23 जानेवारी रोजी किनवट येथील पक्षाच्या तालुका संपर्क कार्यालयात
त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
मी एक सामान्य कार्यकर्ता असलो तरी गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील गोरगरीब,
वंचित, दीनदुबळ्या लोकांसाठी काम करत आलो.
गोरगरिबांच्या विविध प्रश्नांसाठी मी नेहमीच पुढाकार घेऊन