किनवटचे माजी नगराध्यक्ष यांचा मांडवीच्या स्टेट बँकेत आत्महत्येचा प्रयत्न.
अँकर/ गेल्या अनेक महिन्यापासून पत्नीला व मला पीक कर्ज का देत नाही म्हणून वैतागलेले किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी
मांडवीच्या स्टेट बँकेत पंख्यालाच लायलोन दोरी लटकुन चक्क फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने माडवीच्या बँकेत चांगलीच खळबळ उडाली.
माजी नगराध्यक्ष अरुण आळणे व त्यांची पत्नी करुणा अरूण आळणे यांचे कनकी शिवारात शेती आहे या शेतीवर दोघांनी पीक
कर्जासाठी मांडवीच्या स्टेट बँकेकडे पीक कर्जाची फाईल दिली अनेक महिने होऊन सुद्धा मांडवीच्या बँकने पीक कर्ज दिले नाही
या कर्जासाठी त्यांनी अनेक वेळा बँकेच्या पायऱ्या झिजवील्या पण उपयोग झाला नाही अखेर आज ११ जानेवारी २०२१ च्या दुपारी अरुण आळणे यांनी बँकेतच दोर घेऊन आले
व फिल्ड ऑफिसरच्या टेबल वर चढून पंख्याला दोर बांधून फाशी घेण्याचा प्रयत्न केला उपस्थित पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे, विजय कोळी,
बँकेचे सुरक्षा रक्षकांनी प्रसंग सावधानता बाळगत त्यांना खाली उतरविल्याने पुढील अनर्थ टळला या अचानक झालेल्या घटनेमुळे बँकेत उपस्थित शेतकरी व बॅंक कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला,
ऑफिसर शैलेश यांनी या बँकेला बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी असून ती सतत बंद असते त्यामुळे बँकेचा नाईलाज आहे
केवळ दोनशे शेतकऱ्याचे पीक कर्ज प्रकरणे आता प्रलंबित आहेत ती सर्व येत्या पंधरा दिवसात पूर्ण करू,
एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.