Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता. प्रतिनिधी मारोती देवक केंद्रीय प्राथमिक शाळा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी


किनवट ता. प्रतिनिधी मारोती देवक केंद्रीय प्राथमिक  शाळा  येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

आज दि.12 जानेवारी 2021 रोजी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला 

येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली

सुरूवातीला उपस्थितांच्या हस्ते 

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

 यावेळी झालेल्या कार्यक्रमात कमठाला ग्रा.पं.च्या सरपंच अनुसयाबाई तडसे अध्यक्षपद भूषविले तर

 प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री शिवाजीराव पाटील कर्हाळे,श्री दयानंद पाटील कर्हाळे,

श्री श्याम पानपट्टे तसेच मारेगाव बीटाचे शि.वि.अ.तथा कमठाला केंद्राचे केंद्रप्रमुख मा. शिवाजीराव खुडे साहेब हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमठाला केंद्रीय मुख्याध्यापक श्री शरद कुरूंदकर  यांनी केले.

यात स्वराज्यस्थापनेच्या कार्यात राजमाता जिजाऊ यांची भूमिका तसेच स्वामी विवेकानंदांचे देशासाठी योगदान या विषयावर सविस्तर माहिती दिली.

यानंतर शिवाजीराव खुडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 


यावेळी श्रीहर्षा कर्हाळे,तन्वी तवरकर,अनुष्का कर्हाळे ,दुर्गा हासबे या विद्यार्थीनींनी जिजाऊ मॉंसाहेबांच्या वेशभूषेत उत्कृष्टपणे  भाषणे सादर केली.


विद्यार्थीनींच्या भाषणांची तयारी पाहून शि.वि.अ.मा.शिवाजीराव खुडे साहेब आणि सरपंच मा.श्रीमती अनुसयाबाई तडसे  यांनी विद्यार्थीनींना प्रत्येकी 100 रूपये बक्षिस दिले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व  यशस्वितेसाठी 

शाळेतील शिक्षिका श्रीमती  पाटील मॅडम आणि श्रीमती  सांगवीकर मॅडम यांनी  मोलाचे  सहकार्य दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अंकुश राऊत सर यांनी केले.