Ticker

6/recent/ticker-posts

किनवट माहूर विधानसभा प्रमुख सतीशभाऊ यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रस्थ किनवट माहूर तालुक्यात प्रचंड वेगाने वाढत



किनवट माहूर विधानसभा प्रमुख सतीशभाऊ यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रस्थ किनवट माहूर तालुक्यात प्रचंड वेगाने वाढत असताना दिसत असून तरुण वर्ग मोठ्या 

प्रमाणात बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन प्रहार पक्षात प्रवेश करू लागला आहे.

 दरम्यान आज प्रहार'च्या जनसंपर्क कार्यालयात समतानगर येथील युवा नेतृत्व अभय नगराळे, 

अब्दुल समद व चंद्रकांत अन्नापुरे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.


प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा शिक्षण राज्यमंत्री


नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या सक्षम व धर्मनिरपेक्ष नेतृत्वाला प्रभावित होऊन किनवट माहूर तालुक्यातील तरुणांचा मोठा वर्ग या पक्षाकडे आकर्षित होत असून 

 मागील साधारणतः दीड ते दोन महिन्याच्या कालावधीतच या पक्षाने किनवट माहूर विधानसभा क्षेत्रात आपले मोठे प्रस्थ निर्माण केले आहे.

 पक्षाचे विधानसभा प्रमुख सतीशभाऊ हे पक्ष 

संघटनासाठी किनवट माहूर विधानसभेतील खेड्यापाड्यात तसेच वाडी तांड्यात जाऊन पक्षाची विचारधारा पटवून देत आहेत. 

दरम्यान त्यांच्या या विचाराला प्रभावित होऊन आज प्रहारच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला 

असून या  सोहळ्यात समतानगर येथील युवा नेतृत्व अभय नगराळे, चंद्रकांत अन्नापुरे तसेच 

मुस्लिम समाजातील अब्दुल समद यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. 

याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पाटील,


 युवा तालुका सचिव तेजस कयापाक, सोशल मीडिया प्रमुख निखील कारले,संतोष तलांडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन 

पक्षात स्वागत करण्यात आले व तात्काळ पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना विविध पदावर नियुक्त्या देण्यात आल्या. 

पक्षाच्या किनवट तालुका युवक अध्यक्षपदी अभय मधुकर नगराळे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष म्हणून 

अब्दुल समद महमद वजीर यांची तर किनवट तालुका उपाध्यक्षपदी चंद्रकांत दिगंबर अण्णापुरे यांची 

नियुक्ती करण्यात आली असून विधानसभा प्रमुख सतीशभाऊ  यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्य शिक्षण मंत्री नामदार बच्चुभाऊ कडू हे 

महाराष्ट्राला लाभलेले सक्षम व कणखर नेतृत्व असून त्यांचे कार्य धर्मनिरपेक्ष आहे.

सर्वच जाती समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा हा पक्ष असल्यामुळे बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाला 

प्रभावित होऊन किनवट माहूर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. 

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीपर्यंत आम्ही किनवट माहूर मतदारसंघात एक सक्षम पर्यायी पक्ष

 म्हणून प्रहार पक्षाला लोकांसमोर मांडणार आहोत तसेच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन

 किनवट माहूर तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी परिश्रम घेऊ 

आणि जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाऊ देशमुख तसेच वरिष्ठ नेत्यांच्या 

मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीवर निश्‍चितपणे प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा

 फडकविणार असल्याचा विश्वास विधानसभा प्रमुख सतीशभाऊ 

 यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केला तर पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले 

की विधानसभा प्रमुख सतीशभाऊ  जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाऊ देशमुख यांच्या 

नेतृत्वाखाली आम्ही पक्षासाठी निष्ठेने काम करू तसेच पक्षवाढीसाठी अथक परिश्रम घेऊ.


या  प्रसंगी प्रहार पक्षाचे मयुर महाबळे, शेख नजीर, शेख सादिक, राहुल गिमेकार,अन्सार 

पठाण, शेख फकीर, सत्यशील पाटील, अनिल भगत,पप्पू सातपुते,संतोष तलांडे, नितीन कार्ले,

राजू पुरुषोत्तम वाघ, माधव सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.