Ticker

6/recent/ticker-posts

राजू पाटील सुरोशे यांच्या नेतृत्वात घोटी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी


राजू पाटील सुरोशे यांच्या नेतृत्वात घोटी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी

किनवट (तालुका प्रतिनिधी)
किनवट शहरापासून जवळच असलेल्या मौजे घोटी या शांतताप्रिय गावांमध्ये सर्वधर्म समभाव 

या भावनेतून घोटी गावकऱ्यांच्या सहकार्याने किंबहुना आशीर्वादाने राजू पाटील सुरोशे यांच्या 

नेतृत्वात राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांची जयंती मान्यवरांच्या साक्षीने व घोटी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरी करण्यात आली 

म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ चे विचार आत्मसात करता येतात म्हणजे त्यांचे विचार जीवनात आणल्यास उच्च दर्जाचे जीवन जगता येते हे 

मान्यवराच्या मार्फत प्रबोधनकार अतुल बळेकर यांनी सांगितले तसेच प्राध्यापक पंजाब शेरे  सर यांनी आपल्या 

प्रबोधनातून राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन 

चरित्रावर व शिक्षण आणि संस्कार याविषयी त्यांनी उच्च दर्जाचे मार्गदर्शन केले. 

राजू पाटील सुरोशे हे गावातील एक युवा नेतृत्व आहे

 ते गेल्या दहा ते बारा वर्षापासून गावकऱ्यांसाठी काम करतात म्हणजेच ते सतत सेवा वृत्तीतून आपले जीवन समर्पित करत  आलेले आहेत. 

त्यांच्या जीवनात 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण आहे हे त्यांच्या जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. 
त्यांना सर्व गावकऱ्यांचा आशीर्वाद आहे ते गावकरी मंडळी च्या सहकार्याने त्यांनी अनेक सामाजिक काम केले आहेत. 

या नेतृत्वाला योग्य त्या ठिकाणी काम 
करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा किनवट तालुक्यातील बहुतांश जनसामान्यांची आहे. 

म्हणूनच की काय त्यांच्या हातून असे पवित्र काम पार पडत असते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते 

राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,

 यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित नागरिक आनंदराव सुरोशे पाटील, 

तर प्रमुख उपस्थिती प्रबोधनकार अतुल बळेकर, प्राध्यापक पंजाब शेरे सर, अशोक कोसले, वामन वाडई,  

राम गरड, अशोक सुरोशे,,जगदीश गरड पाटील, सोमा पाटील, कार्यक्रमाचे आयोजक राजू सुरोशे 

पाटील, अभिजीत गरड पाटील, पद्माकर भवरे ,संतोष मिरासे ,कविराज भवरे, चंद्रशेखर गरड 

पाटील, भीमराव पाटील, घोटी गावचे पोलीस पाटील प्रविण माथुरे,  प्रकाश गरड,पांडुरंग खरे, 

अनिल मुनेश्वर, गजानन गरड, पप्पू गरड, वैभव गरड ,अनिकेत सुरोशे, निकेतन सुरोशे,

 गौरव सुरोशे, ज्ञानू बोंडारकर, ओम कदम, चैतन्य कदम 

आकाश पवार, विकास पवार, आदीसह गावातील व परिसरातील बहुतांश प्रतिष्ठित महिला, शेतकरी कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.