Ticker

6/recent/ticker-posts

*थोर समाज सुधारक बळीराम पाटील यांच्य४८ व्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न


*थोर समाज सुधारक बळीराम पाटील यांच्य४८ व्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न*

:बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

प्रारंभी थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचा प्रेरक अर्धकृत्ती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, माजी आयुक्त,

 वसई विरार,मुंबई येथील गोविंद राठोड,किशिसस्थेचे सचिव शंकरराव चाडावार, 

कोष्याध्यक्ष जसवंतसिंग सोखी,डाॅ.प्रशांतजी मांडवी, माजी प्राचार्य वि.मा.शिंदे, 

रक्तदान शिबिराचे उदघाटन  डॉ. यू. पी.धुमाळे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. घोडके ऋषीकेश 

महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, 
उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार,

 पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी एस.एस.रासेयो स्वयंसेवक किशोर आडे ,

 निलेश राठोड, यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे  यांनी  केले. 


प्रास्ताविकातून थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या समाजिक, शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.रक्तदानांचे महत्त्व सांगितले.


याप्रसंगी महाविद्यालयास पहिल्यांदा सदिच्छा भेट दिल्यामुळे गोविंद राठोड, माजी आयुक्त वसईविरार,मुंबई यांचा सत्कार महाविद्यालय,व संस्थेच्या वतीने करण्यात आले.

किनवट शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय व रुग्णालय,नांदेड येथील रक्तसंक्रमण अधिकारी संपूर्ण टीमचे स्वागत करण्यात आले.

राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी भारतीय सैन्य दलात लागल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 कोरोना या महभंयकार रोगाची लागण झाल्याने संपूर्ण जग एका बिकट परिस्थितीत वावरत आहे.

आशा बिकट परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन एकुण चाळीस पिशव्या रक्तसंक्रमण करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबीर घेऊन सेवा करण्याचे काम रासेयो विभागाने केले आहे. 

रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेविका, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त 

विद्यापीठ,नाशिक,शाखा बळीराम पाटील महाविद्यालय,किनवट माजी पर्यवेक्षक प्रा. प्रकाश उत्तरवार यांनी सत्तरा वेळा रक्तदान केले.

ती परंपरा पुढे चालू ढेवण्यासाठी त्यांचा मुलगा शंतनू उतरवार यांनी रक्तदान केले.
एलआयसी डि.ओ.प्रतिक मुनेश्वर, 

नगर परिषद किनवट येथील विद्युत अभियंता विनोद पवार, 

हिंदी विभागाचे डॉ. गजानन वानखेडे, रासेयो स्वयंसेविका कोमल राठोड, 

सामाजिक क्षेत्रातील यमुना केंद्रे, ज्योती कोटावार,महम्मद कलीम, म. हाजी, जफर खान अफीफ खान, 

संदीप येशीमोड,यांनीही  रक्तदान केले.
एकुण चाळीस रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो सल्लागार 

प्रा. डॉ. आनंद भालेराव,डाॅ.अंबादास कांबळे, डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा. विजय खूपसे,प्रा.एम.आय पवार, 

ग्रंथपाल मंदाकिनी राठोड, रासेयो  महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.लता पेडलवाड , 

कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र धात्रक, डि. टी. चाटे, रासेयो स्वयंसेवक किशोर आडे, 

निलेश राठोड, अनिकेत पहूरकर,निखिल खराटे, 

अनिकेत ठाकुर,सुधीर पाटील याच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

रक्तदान शिबिराचे संचलन रासेयो क. म. कार्यक्रम अधिकारी  प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांनी केले.

तर आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव यांनी मानले.