Ticker

6/recent/ticker-posts

{ अनाथाची माऊली...!✒ पोलिस कर्मचारी सलमा शेख यांनी बेवारस चिमकल्याला स्तनपान...


{ अनाथाची माऊली...!✒ पोलिस कर्मचारी सलमा शेख यांनी बेवारस चिमकल्याला स्तनपान....! 

काल शनिवारी दि. 16 जानेवारी रोजी हिंगोली बसस्थानकावर एक पाच ते सहा महिन्याच्या चिमुकल्या बालकास कोणीतरी सोडून गेला. 

हिंगोली शहर पोलीसांनी त्या चिमुकल्या बालकास ताब्यात घेऊन सामान्य रूग्णालयात दाखल केले. 

त्याची प्रकृती चिंताजनक होती. बालकास आईच्या दुधाची नितांत गरज होती. 

बालरोग तज्ञांनी त्यास आहार म्हणून दुध पावडर ड्रापने देणे सुरू केले. परंतु त्याला दूध पावडरने गॅसेस होत होते. 

त्यामुळे रुग्णालयातील प्रसूती वार्डातील मातांना सदरील बेवारस अनाथ बालकास स्तनपान करण्याची विनंती करण्यात आली. 

परंतु कुणी पुढे आले नाही. यामुळे उपस्थित खाकी वर्दीतील माऊलीला माणूसकीचा पाझर आला. 

खरंच पोलिस कर्मचारी सलमा शेख यांचे मातेरूपी मन जागृत झाले.

 त्या हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पोलिस दलात कार्यरत आहेत. 

क्षणाचाही विलंब न करता त्यांनी बेवारस सापडलेल्या चिमुकल्याला कवेत घेऊन स्तनपान केले. 

येथेच माणूसकी गहिवरून आली. मातेच्या हदयाच्या माऊलीने माणूसकीचे जिवंत दर्शन दिले.

 एकीकडे जात,पात,धर्म यावरुन समाजमन ढवळून जात असतांना पोलिस कर्मचारी सलमा शेख या भगिनींने समाजाला एक आदर्श पायवाट योगायोगाने करून दिली आहे.

 यावेळी त्यांच्या समवेत पोलिस कर्मचारी सुरेखा अत्राम, शारदा ढेंबरे उपस्थित होत्या. 

या संदर्भात अनाथाची माऊली सलमा शेख यांना बोललो असता त्यांनी सांगितले की, 

आम्ही त्या चिमुकल्यास रूग्णालयात अॅडमिट असतांना वेदना जाणून घेतल्या. तो गॅसेस मुळे सारखा रडत होता. 

डॉक्टरांनी स्तनपान करण्याची विनंती करून कुणी पुढे येत नव्हते. मला दोन वर्षीय मुलगी आहे. 

मी अक्षरशः बालकाची अवस्था पाहून गहिवरून गेले. त्यास स्तनपान केले

 व करीत राहिल. हे वाक्य ऐकून मीही या खाकी वर्दीतील माऊलीला सलाम करतोय✒🙏

कल्याण देशमुख
 पत्रकार हिंगोली