Ticker

6/recent/ticker-posts

फोर्ट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते


फोर्ट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

शिवसेनाप्रमुखांच्या या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे. 

पुतळा ९ फूट उंच असून बाराशे किलो ब्राँझपासून बनविण्यात आला आहे

 पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर बसविण्यात आला आहे.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे,

 राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, 

उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,

 कृषी मंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

खासदार अरविंद सावंत, मुंबई आयुक्त इक्बालसिंह चहल, सौ. रश्मी ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.