पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही-डी.टी.आंबेगावे
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहिर
किनवट तालुकाध्यक्षपदी आनंद भालेराव
नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी दि.२० जानेवारी २०२१ रोजी जाहिर करण्यात आली.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांवर कदापिही खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नसल्याचे भाष्य केले
तसेच संघाचे संपादक व पत्रकारांचे कुटुंब यांचे कल्याणासाठी
विविध योजना राबवून सक्षम पत्रकार ही संकल्पना संघाने हाती घेतल्याचे सांगितले
यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार,
जिल्हा संघटक शंकरसिंह ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख मारोती शिकारे,
जिल्हा समन्वयक संदीप कांबळे, जिल्हा महिलाध्यक्षा विजया सोनटक्के,
राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे,
मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर
मराठवाडा महिलाध्यक्षा वैशाली हिंगोले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड,
देगलूर तालुकाध्यक्ष मिलींद कावळगावकर, मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे,
कार्याध्यक्ष असद बल्खी, नायगाव तालुकाध्यक्ष अविनाश अतेराये,
बिलोली तालुकाध्यक्ष बलीमोद्दीन फारूकी, भोकर तालुकाध्यक्ष दत्ता बोईनवाड,
किनवट तालुकाध्यक्ष आनंद भालेराव,
हदगाव तालुकाध्यक्ष संदीप तुपकरी, उमरी तालुकाध्यक्ष उध्दव मामडे,
लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पवार, कंधार तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे,
मुखेड तालुका सचिव मोतीपाशा पाळेकर,
नांदेड शहराध्यक्ष हरजिंदरसिंघ संधू, महिला शहराध्यक्षा
विद्या वाघमारे, नांदेड तालुका सदस्या मीना नारळे आदी पदाधिका-यांना संस्थापक अध्यक्ष
डी.टी.आंबेगावे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे
यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उल्लेखनिय कार्याची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी केले