(किनवट : तालुका प्रतिनिधी) ता .३ जाने .
किनवट येथील संथागार वृद्धाश्रमात स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रेरीका क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती हर्षोल्हासात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाच्या सुरवातीस क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले
आमदार केराम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या कार्याचा परीचय दिला व त्यांच्या काव्य साहित्या बद्दल सखोल माहीती सांगीतली या नंतर
व्याख्याते अतुल बेळीकर यांनी सावित्रीबाई व क्रांतीसुर्य जोतीराव फुले यांच्या जीवनपट मांडून व्याख्यान दिले
या कार्यक्रमास प्रमुख अतीथी म्हणुन किनवट -माहुरचे तालुक्याचे आमदार भीमरावजी केराम,
लोकनेते शिवसेना उपजिल्हा प्रमुख जोतीबा खराटे , संथागार चे संचालक माजी नगराध्यक्ष
अरुण आळणे, माजी नगर सेवीका करुणाताई आळणे,प्रसिद्ध व्याख्याते अतुल बेळीकर, NGO
संगिता पाटील, बालाजी मुरकुटे, मारोती भरकड, एल आय सी विकास अधिकारी संदिप पेटकुले,
दत्ता आडे, राजकुमार बाविस्कर, वाडगुरे सर, राजु पेटकुले, संजय गुरनुले, पांडुरंग गुरनुले,
संतोष मऱ्हसकोले, प्रा.डॉ. पंजाब शेरे, प्रा . गजानन सोनोने, मिडलपथचे सम्यक सर्पे,
अजींक्य आळणे, तथा महीला बाल बालीका व संथागार वृद्धा लयातील वृद्ध महिला पुरुष उपस्थित होते.
या कार्यक्रमात सवित्रीबाईच्या वेशभुषेत अनुष्का बेद्रे या शालेय विद्यार्थींनी सर्वांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संथागारच्या अधिक्षिका आकांक्षा आळणे यांनी केले तर आभार राजेश पाटील यांनी मानले.