Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार ; एका उमेदवाराचं भवितव्य ईश्वर चिठ्ठीने उजळलं


किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार ; एका उमेदवाराचं भवितव्य ईश्वर चिठ्ठीने उजळलं

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) : तालुक्यातील एकूण 24 ग्रामपंचायतीकरिता एकूण 70 मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या मतदानाची 

तहसिल कार्यालयात स्थापित मतदान कक्षात मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. 

एका प्रभागात समानमतातून एका उमेदवाराचे भवितव्य ईश्वर चिठ्ठीने उजळले.
       
       सोमवार (दि.18) रोजी सकाळी पावणेदहा वाजता निवडणूक संपर्क अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, तहसिलदार उत्तम कागणे, 

उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक व उमेदवार  यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडून मतमोजणीला प्रारंभ झाला. 

70 मतदान केंद्राकरिता सात टेबलवर दहा फेर्‍यात मतमोजणी करण्यात आली. 

याकरिता 8 पर्यवेक्षक, 8 सहायक पर्यवेक्षक, 9 मतमोजणी अधिकारी (मास्टर ट्रेनर ), 14 शिपाई,कोतवाल आदी अधिकारी, कर्मचारी  नियुक्त करण्यात आले होते. 
       
स्त्री 13791 व पुरुष 14572 अशा एकूण  28362 मतदारांपैकी स्त्री 10847 व पुरुष 11681 अशा एकुण 22528 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

कंचली (ई) ग्रामपंचायत प्रभाग दोन मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून 

अशोक शंकर राठोड व इंद्रसिंग अरविंद राठोड यांना  प्रत्येकी 105 मते व नोटाला 3 मिळाली. 

समान मते मिळाल्याने योगिता शामराव खोब्रागडे या बालिकेच्या हातून काढलेल्या 

ईश्वर चिठ्ठीने इंद्रसिंग अरविंद राठोड यांचे भवितव्य उजळले.

 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैजनाथ काळे, 

के.व्ही. रेनेवाड, गंगाधर शेर्लावार,कल्याण पाठक बालाजी भगनारे, 

एस. एस.पाटील, के.बी. मामीडवार,एस.जी.चिंतावार, विजय मडावी, डि.के. उपलंचवार यांनी काम पाहिले
    

            सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार व तहसिलदार उत्तम कागणे यांच्या मार्गदर्शनाखाली 

नायब तहसिलदार अनिता कोलगणे मोहम्मद रफिक, माधव लोखंडे, सर्वेश मेश्राम, निवडणूक लिपीक नितीन शिंदे, 


मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, स्वामी मल्लिकार्जून, राम बुसमवार, रमेश मुनेश्वर, ग. नु. जाधव, 

योगेश वैद्य, रुपेश मुनेश्वर, विनय वैरागडे, गोविंद पांपटवार, संदीप आगळे, संदीप पाटील, 

देवकते, बी.आर. इंदुरकर, व्ही.टी. सूर्यवंशी,मिलिंद टोणपे, रामेश्वर मुंडे, जी.बी. दुसाने, मनोहर पाटील, 

गजानन हिवाळकर,एम.एम कांबळे आदिंनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. 

पर्यवेक्षक म्हणून मनोज टिळे,पी.आर. शिंदे,डी.एल. डोंगशनवार, विनोद पवार, कलीम खान पठण, 

सूर्यकांत बाच्छे, एस.एन.पाटील, एस.एस वाटेगावकर व सहायक पर्यवेक्षक म्हणून दादाराव नैताम, 
रामदास कऱ्हाळे, प्रमोद भवरे, रमेश नेम्माणीवार, यशवंत बिऱ्हाडे, शेख नजीर, कृष्णकांत सुंकलवाड यांनी कार्य केले.
        
   उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली 
पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किणगे

 व संतोष केंद्रे यांच्या सहकार्याने 5 अधिकारी, 63 पोलिस कर्मचारी व 10 होमगार्ड यांचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

फोटो कॅप्शन
किनवट : ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी प्रसंगी सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार,

 तहसिलदार उत्तम कागणे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक आदी
 ( छाया : निवेदक कानिंदे )