नागपूर विधान भवनात विधानमंडळ कक्षाचे आज उद्घाटन झाले. नागपूर विधान मंडळांमध्ये अधिवेशनाशिवाय बाराही महिने विधिमंडळाचे कामकाज आता सुरू राहील
तसेच महाराष्ट्र हे प्रशासनाचे विकेंद्रीकरणाचा पुरस्कार करणारे
राज्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या विधिमंडळ कामकाजात नागपूर अधिवेशनाला महत्त्व आहे.
अनेक महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर अधिवेशनात झाले आहेत.
आता या ठिकाणी बाराही महिने विदर्भातील आमदारांच्या सोयीसाठी कायमस्वरुपी कक्ष
उघडल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.
नागपूर येथे आता नियमित कक्ष झाल्यामुळे विधिमंडळ परिसरात नियमित वर्दळ असेल.
विदर्भाच्या प्रश्नावर कायम चर्चा सुरू असेल. विधिमंडळ परिसरातील कक्षाच्या लोकार्पण
प्रसंगी विदर्भावर कोणताही अन्याय होणार नाही याबाबत मी आश्वस्त करतो.
विदर्भ कायम हृदयात आहे, असे त्यांनी सांगितले.