Ticker

6/recent/ticker-posts

आज महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सोबत बैठक व भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्न


आज महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सोबत बैठक व भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्न, 

जनतेच्या हिताच्या मागण्या मांडल्या त्या पूर्ण करण्यासाठी पूर्णतः सहकार्य करण्याचा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी दिला

या मागण्यातुन नक्कीच हिंगोली लोकसभा मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ म्हणून 

महाराष्ट्रात नाव लौकीकास येईल याची मला पूर्ण खात्री आहे.
मागण्या:-

@हिंगोली जिल्ह्यातील हळद कलस्टरला GST/वीज बिलांमध्ये सबसिडी संदर्भात विशेष सवलत देणे यातून शेतकरी, व्यापारी यांना हळद शेती व उद्योग याकडे आकर्षीत करून हिंगोली जिल्ह्याची नाउद्योग जिल्हा ही ओळख संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणे.

@माहूर, औंढा नागनाथ, नरसी नामदेव, जटाशंकर या तीर्थक्षेत्रांना विशेष दर्जा व सुविधा देऊन पर्यटन विकासातून मतदारसंघातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.

@पूर्णा, आसना,पैनगंगा कायाधु,नदीवरील बंधारे बांधकाम करून शेती व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमचा सोडवणेसाठी मार्ग काढणे.

@पैनगंगा अभयारण्य आणि सहस्त्रकुंड धबधबा याठिकाणी विशेष सुविधा देऊन देशभरातील पर्यटकांना आकर्षीत करणे.

@वर्धा-नांदेड रेल्वे फंड देऊन लवकरात लवकर मार्ग पूर्ण करणे  बाबत.

@महाराष्ट्राची जननी असलेल्या गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणे.


@शेतकऱ्यांना पीकविमा लवकरात लवकर आणि जलद मिळणेसाठी आणि पीकविमा 

संदर्भातील वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासंदर्भात उपाय योजना करणे


@हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बंदी भागातील रस्ते मंजुरी व वाहतुकीची सोय करून 

भागाचा सर्वांगीण विकासाबाबत आज सकारात्मक चर्चा झाली.
 CMOMaharashtra  #Shivsena #HingoliLoksabha