मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते 'बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूरचे' उदघाटन व लोकार्पण करण्यात आले.
विदर्भातील निसर्ग पर्यटन वाढीसाठी हा प्रकल्प महत्वाचा असून आदिवासी समाजाची अस्मिता,
रूढी आणि परंपरा जपणारा 'गोंडवाना थीम पार्क' या प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण केला जाईल
अशी घोषणा केली.बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूरचे उदघाटन प्रसंगी मा.पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री.आदित्यजी ठाकरे,
वन मंत्री संजय राठौड़ मा. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री.सुनीलजी केदार यावेळी उपस्थित होते.