Ticker

6/recent/ticker-posts

*दिव्यांग बांधवाना शासन प्रशासन सुसह्य जीवन जगण्यासाठी न्याय हक्क द्या नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी द्या चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर*


*दिव्यांग बांधवाना शासन प्रशासन सुसह्य जीवन जगण्यासाठी न्याय हक्क द्या नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी द्या चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर*



नांदेड :- दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली व अनेक संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यात अनेक आंदोलन करून 


दिव्यांगाना न्याय हक्क मिळत नसल्याने जिल्हाधिकारी साहेब नांदेड  यांच्या  मार्फत मा. पंतप्रधान साहेब संसद भवन नवी दिल्ली 

मा. मुख्यमंत्री साहेब मंञालय, मुंबई 

मा. सामाजिक न्याय मंञी मंञालय मुबई
मा बच्चू भाऊ कडु राज्यमंत्री  मुंबई 

मा सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री नांदेड 
मा. दिव्यांग आयुक्त साहेब  पुणे


मा. विभागीय आयुक्त साहेब ओरंगाबाद ईत्यादी मंञी व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे  

दिव्यांग बांधवाना त्यांना सुसह्य जीवन जगण्यासाठी हक्क व न्याय द्या नसेल तर दिव्यांगाना स्वेईच्छा मरण्याची परवानगी 


मिळेपर्यंत दि २४ जाने २०२१ पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो बेमुदत धरणे  आंदोलन करित असल्याचे निवेदनाद्वारे दिला ईशारा.
  

    दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून शासन दिव्यांग कायदा २०१६ ला करून व न्यायालय दरवेळी शासन 

प्रशासन यांना खडसाऊन सुध्दा कुंभकर्ण प्रशासन जागे करण्यासाठी ज्या दिव्यांगाना चालता येत नाही. दिसत नाही ऐकू येत नाही 

अशा दिव्यांगानी अनेक आंदोलने केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी अनेक लेखी आदेश व वेळापञक कनिष्ठ अधिकारी यांना देऊन व 

आंदोलन कर्त्याना एका महिन्यात  आपले प्रश्न सोडविण्यासाठी व जे कर्मचारी दिव्यांगाच्या कामात दिरंगाई करातील त्यांना शिस्तभंगाची कारवाई केली 

जाईल असे लेखी आश्वासन देऊन वारंवार आश्वासन व वरिष्ठ अधिकारी यांनी  कनिष्ठ अधिकारी यांना पस्तीस लेखी पञ व 

वारंवार मिटिंग मध्ये आदेश देऊनही दिव्यांगाना हक्काच्या सवलतीपासुन वंचित ठेवणाऱ्या किती अधिकारी यांच्यावर वरिष्ठ अधिकारी कार्यवाही केली . 


   सार्वजनिक बांधकाम मंञी व पालकमंत्री  व जिल्हाधिकारी नांदेड यानी 


१)  *दिव्यांग मित्र अॅप नांदेड* ची निर्मिती करून त्या अँपचे उदघाटन करून वेळापञक ठरून दिले पण सात महिन्यात साधी दिव्यांगाची यादी तयार झाली नाही, 


दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या अनेक योजना समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात 

येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्या करीता दिव्यांग मित्र अॅप 

नांदेड ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली

 व एकही दिव्यांग  वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक १४जुलै ते ३१ जुलै २०२० पर्यंत

 नाव नोंदणी व दि .१ आँगस्ट ते १०आँगस्ट २० पर्यंत छाननी व १५ आँगस्ट २० ला 

लाभ देण्याचे लेखी आदेश व देऊन सुध्दा सात ते आठ महिन्यात या 

अॅप यादी जाहीर झाली नाही जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळणाऱ्या दिव्यागाना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली काय? 



 *दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने मोजमाप शिबीर*
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगाना हात,

 पाय, तिनचाकी सायकल 

व्हिलचर,वाकर,काठ्या,कुबड्या ईत्यादी दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य 

मोजमाप तर वयोश्री शिबीराचे आयोजन करून वयोवृदाना ,चष्मा, वापर, दाताची कवडी, 

व्हीलचर ईत्यादी साधने देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सोळाहि तालुक्यात शिबिर आयोजित करून लाखो रुपये दिव्यांग राखीव निधीतून खर्च करण्यात आले होते. 

पण
ज्यांचे मोजमाप घेऊन तेरा महिने झाले 
तो मापाचे साहित्य आता जुळले काय?

 आपणास साहित्य मिळेल 

या आशेने पडत झडत आलेला दिव्यांग वृध्द यांना आज पर्यंत एक हि पायाभूत साधने व साहित्य मिळाले नाही. 

व  शिबिराचे श्रेय लागणारे नेते व प्रशासकीय अधिकारी यांना दिव्यांची साहित्याची का आठवण येत नाही  आठवण दिव्यांगानी दिली तर का दुर्लक्ष केले जाते. 
    

   नेते मंञी प्रशासकीय अधिकारी यांना  जसे हक्क मिळतात तसे 

हक्क दिव्यांग वृध्द याना मिळत नसल्यास  कुञ्यासारखे जीवन जगण्यापेक्षा आम्हा

 दिव्यांगाना मानसन्मानाने स्वईच्छा मरण्याची आम्हि मताच्या शक्तीने सतेत पाठविलेले मंञी, 

प्रशासकीय अधिकारी यांनी देऊन या खडतर दिव्यांग जन्मातुन मुक्त करावे 

असे निवेदन दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे जी 

अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, राजुभाऊ शेरकुरवार, गजानन हंबर्डे,संतोष नरवाडे, सविता नांवदे,सुभद्राबाई शिंदे, दिनेश ऊपे, 

गणेश भास्करे, बाबुराव वानोळे, महानंदा गाडे, संदीप झगडे, ईत्यादी कार्यकर्ते निवेदनाद्वारे दिले.