Ticker

6/recent/ticker-posts

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने तुर नोंदणी खरेदी केंद्र निश्चित


खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने तुर नोंदणी खरेदी केंद्र निश्चित
--------------------------------------------------------


    किनवट/माहूर: केंद्र  शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या  वतीने नांदेड जिल्ह्यात  खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये तूर नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली 

असून खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे  जिल्ह्यात ८ ठिकाणी नोंदणी  सुरु करण्यात आली आहे . 
     
   खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आजवर हिंगोली  लोकसभा क्षेत्रातील नांदेड जिल्यातील किनवट , माहूर , हदगाव ,हिमायतनगर तालुक्यात मका ,ज्वारी, 

धान खरेदी केंद्र सुरु करवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे . यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा तालुक्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले 

असून शासनाकडून शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात यावी याकरिता खासदार हेमंत पाटील  यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला असून 

यावरून नांदेड जिल्ह्यातील ८ ठिकाणी तूर नोंदणी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत . खरेदी  केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे . 

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह  मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सहकारी खरेदी विक्री संघ म.हदगाव केंद्र चालक चव्हाण , 

कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट आणि  तालुका कृषी प्रक्रिया संस्था गणेशपूर येथे केंद्र चालक तिरमनवार ,

विदर्भ को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. अंतर्गत सरसम येथे सरसम ऍग्रो प्रोड्युसर कंपनी येथे केंद्र चालक दमकोंडवार तर इतर ठिकाणी महा 

फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत हदगाव तालुक्यातील तळणी,येथे तावडे फार्मर प्रोड्युसर कंपनी केंद्र चालक विजय लोखंडे ,

 निवघा बाजार येथे शेवंतामाता फार्मर प्रोड्युसर कंपनी केंद्र चालक 

गजानन शिंदे, सरसम येथे पारडी रेणुका  फार्मर कंपनी केंद्र चालक सदशिव पतंगे , 

किनवट येथे किनवट परिसर शेतकरी प्रोड्युसर कंपनी केंद्र चालक श्रीकांत पुरेवार या ठिकाणी संपर्क साधावा.  

शेतकरी बांधवानी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करून नोंदणी करावी. नोंदणी करिता खरीप हंगाम २०२०-२१ मधील पीकपेरा 

 नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाईन ७/१२ आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावे व  

बँक पासबुकवर शेतकऱ्याचे नाव खाते क्रमांक आय. एफ. एस. सी. कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किंवा

 पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये) संबंधित तालुक्यातील व  तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी तूर 

हमीभावाने खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे .