श्रमदान संकल्प
मित्रांनो ३ नोव्हेंबर २०२० रोजी आपण संथागार वृध्दाश्रमाची पायाभरणी केली.
आज संथागार आनंदाने बहरतो आहे.
विविध स्तरांतील लोक आज संथागाराला मदतीचा हात देत आहे..
तेंव्हा माझ्या मित्रपरिवारातील मित्र- मैत्रीणींनी श्रमदान देण्याची इच्छा दर्शविली..
त्यामुळे आश्रमासाठी एक नवा उपक्रम चालु करण्याची दिशा मिळाली...
तेंव्हा श्रमदान करण्यासाठी ईश्चुक असलेल्या व्यक्तींच्या आग्रहास्तव हे आव्हान आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत.....
# तुम्ही श्रमदानाचा संकल्प खालीलप्रमाणे करू शकता
१) एक दिवसाचा श्रमदानाचा संकल्प
२) दोन दिवसांचा श्रमदानाचा संकल्प
३) चार दिवसांचा श्रमदानाचा संकल्प
४) आठ दिवसांचा श्रमदानाचा संकल्प
#बाहेर गावच्या लोकांची राहण्याची व जेवणाची सोय संस्थेमार्फत केल्या जाईल...
#नावनोंदणी साठी अगोदर संपर्क साधावा लागेल..
#एका वेळेस फक्त दोन सेवादारांना परवानगी मिळेल...
#श्रमदान केल्या नंतर प्रमाणपत्र देऊन सेवादारांना आश्रमातर्फे गौरविण्यात येईल...
संपर्क : ९४२३६२७११६ ,९४०३६३६२५८
आकांक्षा करुणारुण आळणे
अधिक्षक
संथागार वृध्दाश्रम