Ticker

6/recent/ticker-posts

*भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशसरचिटणीस सत्यवान गावडेंच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप


*भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशसरचिटणीस सत्यवान गावडेंच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप*

गेल्या अनेक वर्षापासुन तळागाळातल्या अन्यायग्रस्त उपेक्षीत व संधी न मीळालेल्या 


ग्रामीण व शहरी कलाकारांसह चित्रपट व इतर कार्यक्षेत्रात कार्यरत कामगारांसाठी देशाचे 

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,अमीतजी शहा व जे.पी नड्डा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष 


विजयजी सरोज व प्रदेश संघटक एसपी सुर्या यांच्या साथीने लढा देणा-या भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस 

मा.सत्यवानजी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज नांदेड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना फळ व खाऊचे वाटप केले.
    

   किनवट माहुरसह जिल्हाभरात सर्वदुर परीचीत असलेले अभीनेते दिग्दर्शक तथा

 एक निर्भिड पत्रकार व नुकतेच भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त झालेले

 लक्ष्मीकांत मुंडे हे अनेक वर्षापासुन सामाजिक राजकीय क्षेत्रासह कला क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहेत 

तळागाळातील कलाकारांसह कामगारांना न्याय व त्यांच्या हक्कासाठी काम करत असलेल्या 

भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या माध्यमातुन जनमानसापर्यंत पोहचुन संघटन वाढीसाठी प्रयत्नशील आहेत यात त्यांना प्रदेशाध्यक्ष 


विजयजी सरोज सह प्रदेश सरचिटणीस सत्यवान गावडे व प्रदेश संघटक एसपी सुर्या यांच मोलाच मार्गदर्शन लाभत.दि ६ जानेवारी ला संघटनेचे 

कार्यशील प्रदेश सरचिटणीस सत्यवान गावडेंचा वाढदिवस त्यांनी शालेय व शाळाबाह्य मुलांना खाऊ वाटप करुन साजरा केला

 यावेळी किनवट माहुर विधानसभेचे आमदार मा.भिमरावजी केराम

किनवट नगर परीषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उमाकांत क-हाळे,भाजपा युवानेते सुभाषबाबु नायक,

सरपंच विठ्ठल किरवले,दिगांबर मुंडे,चंद्रकांत मुंडे,पद्माकर आरसोड सह असंख्य ग्रामस्थ उपस्थीत होेते.