Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग बांधवाना न्याय द्या नसेल जिल्हाधिकारी नांदेड बेमुदत धरणे आंदोलन प्रशासन लेखी व तोडी आदेश देऊन केली बोळवण पण एका महिन्यात न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग आंदोलन करण्याचा दिला ईशारा चंपतराव डाकोरे पाटिल


दिव्यांग बांधवाना न्याय द्या नसेल तर स्वइछा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत जिल्हाधिकारी नांदेड बेमुदत धरणे आंदोलन प्रशासन लेखी व तोडी आदेश देऊन केली 
बोळवण पण एका महिन्यात न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग आंदोलन करण्याचा दिला ईशारा चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड :- दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

 यांच्या नेतृत्वाखाली व अनेक संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यात अनेक आंदोलन करून 
दिव्यांगाना न्याय हक्क मिळत नसल्याने जिल्हाधिकारी साहेब नांदेड 

 यांच्या  मार्फत मा. पंतप्रधान साहेब,मा. मुख्यमंत्री साहेब ,मा. सामाजिक न्याय मंञी 
मा बच्चू भाऊ कडु राज्यमंत्री  
मा सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री नांदेड 


मा. दिव्यांग आयुक्त साहेब  
मा. विभागीय आयुक्त साहेब ओरंगाबाद ईत्यादी मंञी व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे  दिव्यांग बांधवाना त्यांना सुसह्यजीवन 

जगण्यासाठी हक्क व न्याय द्या नसेल तर दिव्यांगाना स्वेईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत दि २४ जाने २०२१ पासुन 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो बेमुदत धरणे  आंदोलन सहभागी झाले होते तर या आंदोलनात जाहिर पांठिब 

बेरोजगार दिवकयांगा कल्याणकारी समिती चे अध्यक्ष राहुल साळवे, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर पटेल,महाराष्टृ राज्य 

महिला कामगार संघटनेच्या अध्यक्ष विमलताई  साळवे, व्यवस्थेचा बळी 

सघटनेचे अध्यक्ष रमेश कदम, भारतीय मजदूर किसान सभेचे केंदीय सचिव अशोक घायाळ यांनी जाहीर पाठिंबा व सहभाग नोंदवला. 
 
  तर प्रहार  दिव्मांग क्रांर्ती संघटनेचे अध्यक्ष विठलराव मंगनाळे याच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करून 

सर्व दिवकयांगा संघटनेची १४४ नियम लागू करून सुध्दा हजारो दिव्यांगानी खालील मागच्या संदर्भात आपली शक्ती दाखविली 


व मग जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा करून आठ दिवसात सर्व विषयांवर संघटनेच्या व खातेप्रमुखाची मिटिंग घेऊन खालील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले,
    

दिव्यांग बांधवांच्या मागण्या

१)  दिव्यांग मित्र अॅप नांदेड
दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्या करीता दिव्यांग मित्र अॅप नांदेड ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली 

व एकही दिव्यांग  वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक १४जुलै ते ३१ जुलै २० नाव नोंदणी व दि .१ आँगस्ट ते १०आँगस्ट २० पर्यंत छाननी व १५ आँगस्ट २० ला लाभ देण्याचे लेखी आदेश व देऊन सुध्दा 7 ते महिन्यात या अॅप यादी जाहीर झाली नाही 

जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळणाऱ्या दिव्यागाना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी 

२) दिव्याग राखीव पाच टक्के निधी
ग्रामपंचायत,नगरपंचायत, नगरपालीका,महानगरपालीका, 
पंचायत समिती, जिल्हापरिषद २०१६ पासुन एका वर्षाचा निधी वाटप केला पण पंचायत समिती अद्याप वाटप केली नाही. 

३) दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदान  पाच महिन्यापासून कधीच वेळेत मिळत नाही*

४) खासदार निधी
 विस लाख दरवर्षी दिव्यागाना स्थानिक मतदार संघात खासदार निधी २०१६ पासुन मिळत नाही. 

५) *आमदार निधी*
पंधरा लाख दरवर्षी दिव्यांगाना स्थानिक मतदार संघात आमदार निधी २०१६ पासुन मिळत नाही

६) *अंत्योदय राशन योजना*
दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद आहे.पण नांदेड जिल्हातील अंत्योदय राशन कार्डाचा ईष्टांक नसल्याने दिव्यांगाला अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नाही.अंत्योदय  ईष्टांकात वाढिची मागणी करून लाभ द्यावा. 

७) *दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर*
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून 

लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. पण आज पर्यंत एक हि दिव्यांगाला पायाभूत साधने व साहित्य मिळाले नाही. 

८) म. ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिव्यांगाला दरवर्षी  

किमान 100 दिवस गावातच रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

पण नांदेड जिल्ह्यातील एक ही दिव्यांग व्यक्तीलाम. ग्रा.रो.ह.योजनेत लाभ मिळत नाही. 

९) दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी जागा*
गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. जिल्हात एक ही शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आले नाही.


१०) *दिव्यांग बाधवाना घरकुल* योजनेत प्राधान्य म्हणून पाच टक्के राखीव असुन सुध्दा लाभ मिळत नाही.


११) *दिव्यांगाना पुरस्कार पासुन वंचित ठेवणाऱ्या अधिकारी यांच्यावर 

कार्यवाही करावी
दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना शासन पुरस्कार देऊन गौरवण्यात येते 

त्याबद्दल समाजकल्याण अधिकारी नांदेड यांच्या कडे वेळेच्या आत पुरस्कार प्रस्ताव सादर करून तो पुढे वेळेत न पाठविता पाच महिन्यानंतर 


पाठऊन दिव्यांगाना पुरस्का रापासुन वंचित ठेवणाऱ्या व कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी.


१२) *दिव्यांगाना मारहाण अपमानवागणूक  देणाऱ्यावर 2016 नुसार कलम 92बी 93 प्रमाणे 

आरोपी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

१३) *दिव्यांग बांधवाना दिव्यांग पुनर्वसन संबधित सर्व समित्यावर प्रतिनिधित्व मिळावे* कारण दिव्यांगाचे दु:ख दिव्यांगच मांडु शकते. 


१४) *दिव्यांगाना सुसाह जीवन ऊरनिर्वासाठी ३ एकर जमीन देण्यात यावी*. 



१५) *दिव्यांग बांधवाना राजकीय आरक्षण मिळावे*
देशात बारा करोड दिव्याग असुन लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व राजकीय, प्रशासनात दहा टक्के आरक्षण द्यावे .

१६) दिव्यांगाच्या आँनलाईन तपासणीत खरे दिव्यांगाना न्याय द्यावा* चालिस टक्के पेक्षा कमी असलेल्या फेर तपासणी साठी जे जे हास्पिटल 

मुंबई येथे अपील केल्यानंतर  SADM 
 प्रणाली द्वारे तपासणी केली जात होती .

परंतु दि ३ आँक्टो. १८SADM प्रणाली बंद करून युनिक प्रणालीत तपासणी केली जात आहे.

पण या प्रणालीत फेर अपिलाची नोंद नसल्याने खरे दिव्यांग वंचित राहात आहेत ,
    
  हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, राजुभाऊ शेरकुरवार, गजानन हंबर्डे,

संतोष नरवाडे, सविता नांवदे,सुभद्राबाई शिंदे, प्रमसिंग चव्हाण, 

राहुल सोनुले,हानिफ शेख, गजानन वंहिंदे, राजु ईटलिवाले,कार्तिक भक्तीपुरम

विठलराव बेलकर,  अनिल करडखेडकय,बाली जगेनवाड, बोडके, जाधव ज्ञानेश्वर, दिगंबर लोणे,रवि कोकरे, 

यादव फुलारी राहूल साळवे  चे कार्यकर्ते, समीर पटेल चे सर्व कार्यकर्ते ईत्यादी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते