Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायतनिवडणुकीत नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचे राजश्री पाटील यांच्याकडून अभिनंदन


ग्रामपंचायतनिवडणुकीत नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचे राजश्री पाटील यांच्याकडून अभिनंदन
-----------------------------------------------------
नांदेड:  हिंगोली लोकसभा आणि नांदेड जिल्ह्यातील  ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित शिवसेना तसेच महाविकास 

आघाडीच्या  विजयी उमेदवारांचे गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    

    राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मागील पंधरा दिवस धुमधडाक्यात प्रचार आणि निवडणूक कामाला मोठ्या धामधुमीत सुरुवात झाली होती. 

यंदा राज्यांमध्ये शिवसेना सहित महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या ग्रामपंचायतीवर महा विकास आघाडीचे वर्चस्व कायम ठेवत विजय मिळविला आहे.

 हिंगोली लोकसभा तसेच नांदेड जिल्ह्यातील  शिवसेना प्रणित उमेदवारांनी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. 

नांदेड जिल्ह्यातील  मतदारसंघांमध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीवर बहुमताने शिवसेना आणि महा विकास आघाडीच्या पॅनलचा विजय झाला आहे, 

तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारांनी बहुमताने विजय प्राप्त केला आहे. 

या सर्व विजयी उमेदवारांचे खासदार हेमंत पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत, 

तर गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिष्टचिंतन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

विजयी उमेदवारांनी खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांची भेट घेतली

 हिंगोली लोकसभा मतदार संघातील कळमनुरी तालुक्यातील वडगाव तर्फे जवळा पांचाळ,रामेश्वर तांडा  तर नांदेड दक्षिण मतदार संघातील ब्राह्मणवाडा,धनेगाव, 

वाजेगाव,काकांडी, गंगाबेट,वाहेगाव, खुपसरवाडी, भणगी, पिंपळगाव मिश्री, भायेगाव,हसापुर, विष्णुपुरी ,बाभूळगाव, 

खडकुत,गोपाळचावडी,वाघी,करंजाळा, पावडेवाडी , डेरला , धानोरा (मालकू )  या ठिकाणच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचा समावेश होता.

यावेळी नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर,नांदेड ग्रामीण जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे,

उपतालुका प्रमुख तुकाराम पवार, सर्कल प्रमुख बालाजी भायेगावकर,दत्ता सोनटक्के,रमेश वाघमारे,डॉ.रावसाहेब म्हैत्रे, 

शरद भवर,हणमंत भवर,शंकर सोनटक्के,भारत मोरे,उत्तम पुयड,गोविंद सोनटक्के, 

राजू हंबर्डे,चक्रधर मोरे,शिवाजी कंकाळ, साहेबराव सेलूकर,संजय जाधव,

अरविंद मगर,गणपत राठोड, श्रीखंड कदम रमेश पावडे , कामाजी कदम , बालाजी पोपळे यांची उपस्थिती होती.