किनवटमध्ये 27 रोजी 7 बाधितांची भर
किनवट : शनिवार (दि. 27 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 29 व्यक्तींची एँटिजेन तपासणी केली. त्यापैकी 7 जण बाधित आढळले.
बाधितांमध्ये एस. व्ही.एम. कॉलनी येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 18
वर्षाचा 1 तरुण, दत्तनगर, गोकुंदा येथील 14
वर्षाची 1 मुलगी, किनवट येथील 36 वर्षाचा 1
पुरुष, 28 व 21 वर्षाच्या 2 महिला आणि
कमठाला येथील 37 वर्षे वयाचा 1 पुरुष अशा 7 जणांचा समावेश आहे.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर,
उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 19, व होम क्वारंटाईन 40 अशा एकूण 59 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये,
शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल
आरटीपीसीआर टेस्ट,
आज घेतलेले स्वॅब - 14,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 14,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,
ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट- 29,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 7,
निगेटिव्ह अहवाल- 22,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 7,
आज मृत्यू - 0,