Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये 27 रोजी 7 बाधितांची भर


किनवटमध्ये 27 रोजी 7 बाधितांची भर 

किनवट   : शनिवार (दि. 27 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 29 व्यक्तींची एँटिजेन तपासणी केली. त्यापैकी 7 जण  बाधित आढळले. 
           
         बाधितांमध्ये एस. व्ही.एम. कॉलनी येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 18 

वर्षाचा 1 तरुण, दत्तनगर, गोकुंदा येथील 14 

वर्षाची 1 मुलगी, किनवट येथील 36 वर्षाचा 1 

पुरुष, 28 व 21 वर्षाच्या 2 महिला आणि 

कमठाला येथील 37 वर्षे वयाचा 1 पुरुष अशा 7 जणांचा समावेश आहे. 

बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, 

उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 19,  व होम क्वारंटाईन 40 अशा एकूण 59 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, 

शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल

आरटीपीसीआर टेस्ट,

आज घेतलेले स्वॅब - 14,

आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 14,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,



ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट- 29,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 7,

निगेटिव्ह अहवाल- 22,



आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 7,


आज मृत्यू - 0,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 19 ( 40 होम क्वारंटाईन)