Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये 28 रोजी 11 बाधितांची भर


किनवटमध्ये 28 रोजी 11 बाधितांची भर 

किनवट   : रविवार (दि. 28 फेब्रुवारी) रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार एँटिजेन टेस्ट द्वारे 2 व आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 9 असे एकूण 11 जण  बाधित आढळले आहेत. 
           
    

     आजच्या बाधितांमध्ये रामनगर येथील 11 वर्षाचा 1 मुलगा, किनवट येथील 50 वर्षाचा

 1 पुरुष व 18 वर्षाची 1 मुलगी, 

शिवाजीनगर येथील 51 वर्षाची 1 पुरुष, 

गोकुंदा येथील 55 वर्षाची 1 महिला, एस.व्ही.एम.

 कॉलनी येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, 21 वर्षाचा 1 पुरुष,

 56 वर्षाचा 1 पुरुष, 75 वर्षाची 1 महिला, 

52 वर्षाची 1 महिला, 25 वर्षाची 1 महिला अशा 11 जणांचा समावेश आहे. 
         

  बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे  व होम क्वारंटाईन 

अशा एकूण 70 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये,

 शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, 

असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल

आरटीपीसीआर टेस्ट,

आज घेतलेले स्वॅब - 0,

आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-9,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 14,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,



ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट- 9,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-2,

निगेटिव्ह अहवाल-7,



आज रोजी एकुण पॉझिटीव्ह (आरटीपीसी आर + एँटिजेन) रुग्ण- 11,


आज मृत्यू - 0,

होम क्वारंटाईन व रुग्णालयात उपचार घेत असलेले एकूण बाधित व्यक्ती- 70