प्रिय कॉम्रेडस्
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे.
सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे.
आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत.
आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठाही खंडित केला जात आहे.
भाजपचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक असल्याचे भासवत पोलिसांच्या मदतीने आंदोलक शेतकऱ्यांवर दगडफेक करत आहेत.
सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे. संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.
सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व तीन कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळात देशभर रास्तारोको करण्याचे आवाहन केले आहे.
*शेतकरी आंदोलन*
*चक्का जाम*
*दिनांक 6 फेब्रुवारी 2021*
*वेळ 12 ते 3*
किसान सभेच्या सर्व शाखांनी या आंदोलनाची संपूर्ण तयारी करावी व आंदोलन संपूर्ण ताकतीने यशस्वी करावे असे आवाहन किसान सभेचे राज्य केंद्र करत आहे.
धन्यवाद !
शेतकरी एकजूट जिंदाबाद !
आपलेच
डॉ.अशोक ढवळे
जे.पी.गावीत
किसन गुजर
अर्जुन आडे
उमेश देशमुख