किनवट ( प्रतिनिधी )गोरगरीब महिलांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या गोकुंदा येथील महिलांच्या खंबीर नेत्या
तथा इलेक्ट्रॉनिक मीडिया सदस्य परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली
असून महिला जिल्हाध्यक्ष पद्मा गिर्हे यांच्या हस्ते नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या नियुक्ती बद्दल पोलिस कर्मचाऱ्यांसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
किनवट तालुक्यातील महिलावर्गाच्या विविध प्रश्नासाठी लढा देणार महिलांच खंबीर नेतृत्व म्हणून गोकुंदा येथील परवीन शेख यांची तालुक्यात ओळख आहे.
महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात परवीन शेख नेहमीच पुढाकार घेऊन महिलांना न्याय मिळून देतात तसेच
इलेक्ट्रॉनिक
मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विजया बावदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली
नांदेड जिल्हाध्यक्ष पद्मा गिरी यांनी परवीन शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलिसांच्या कुटुंबासाठी तसेच जनतेच्या न्याय हक्कासाठी काम करणारी संघटना आहे.
भरतीमध्ये पोलिस कुटुंबातील उमेदवाराला पाच टक्के आरक्षण तसेच रनिंग मध्ये 50 सेकंदाचा वेळ वाढवून देण्याचे काम या संघटनेने केल्यामुळे त्याचा
पोलीस कुटुंबांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला त्यामुळे दिवसेंदिवस या संघटनेचा देशभरात विस्तार होताना दिसून येत आहे.
किनवट तालुक्यातील महिलांच्या प्रश्नासाठी मी सतत काम करत आले.
माझ्या या कार्याचे फलित म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य, महिला प्रदेशाध्यक्ष विजया बावदाने,
जिल्हाध्यक्ष शेख शकील महोमद युसूफ,
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पद्मा गिर्हे यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पडण्यास मी कटिबद्ध राहील.
या संघटनेच्या माध्यमातून किनवट तालुक्यातील अन्याय अत्याचारग्रस्त महिलांना निश्चितपणे न्याय मिळून देण्याचे काम करू
अशी प्रतिक्रिया परवीन शेख यांनी नियुक्तीनंतर दिली आहे.
या नियुक्तीबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांसह
कॉंग्रेसच्या
महिला तालुकाध्यक्ष सुरेखा काळे,
मनसेचे मा.तालुकाध्यक्ष नितीन मौहरे,
इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तालुकाध्यक्ष आनंद भालेराव, नासिर तगाले सुहास मुंडे, प्रवीण कोवे,
गंगाधर कदम, अरविंद सूर्यवंशी यांनी परवीन शेख यांचे अभिनंदन केले आहे.