Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्ष संपन्न. / स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा तर्फे शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्पर्धा परीक्ष संपन्न.


शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्ष संपन्न. / स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा तर्फे शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्पर्धा परीक्ष संपन्न. 


300 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग...

किनवट: (तालुका प्रतिनिधी) 
     

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा तर्फे 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी

 स्पर्धा परीक्षेचे आयोजन 14 फेब्रुवारी रोजी एन. के टावर, गोकुंदा येथे करण्यात आले 

असून यामध्ये जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
  

   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षा व शिवरायांचे 

विचार पोहोचवण्याचे काम स्वराज्य युवा प्रतिष्ठान यांनी केले आहे. 

परिक्षेच्या सुरुवातीला शिवरायांच्या पुतळ्याचे पुष्पहाराने पूजन करून 

ठिक 2 वर्षाआधी पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली देण्यात आली 

व  शिवरायांच्या घोषणा देवुन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. 
    

    या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठान गोकुंदा व स्पर्धा परीक्षेचे आयोजक ईलीयाज मोहम्मद, नागेश राव, अभिषेक बामणे, गजानन सूर्यवंशी, अजिज शेख, अरविंद डाखोरे, 

शेख सुलतान, अजय इटकेपेल्लीवार, जावेद शेख, अरबाज शेख यांनी  परिश्रम घेतले 

तर जाकिर सर, बाळकृष्ण कदम, अमन सर, अजिंक्य जाधव, ज्ञानेश्वर कदम, तथागत गायकवाड, विक्रम वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
    

    या स्पर्धेा परिक्षेचे बक्षीस वितरण दिनांक 19 फेब्रुवारी रोजी अपना हॉटेल, गोकुंदा येथे दुपारी 2 वाजता होणार आहे. 

शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलां-मुलींनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने 

सर्वच स्तरातून स्वराज्य प्रतिष्ठान व कार्यक्रमाचे तरुण आयोजकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.