*आदिवासी जंगल अधिकार व जमिन हक्क परिषद किनवट येथे
भुमीहिन,गायरानपट्टेधारक,
आदिवाशी,शेतमजूर,दिव्यांग,
विधवा निराधार यांनी सहभागी व्हावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी मांडवी माहुर मेळाव्यात केले*
माहूर :-
अखिल भारतीय किसान मजदूर सभा व आदिवासी हक्क संघर्ष समिती, दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संयुक्त कृति समितीने आयोजित आदिवासी जंगल अधिकार
व जमिन हक्क परिषद गजानन महाराज मंगल कार्यालय किनवट येथे दि २१ फ्रेबु २१ रोज रवि सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत जंगल अधिकार
जमीन हक्क परिषदेत हजाराच्या संख्येनी आपल्या हक्कासाठी सहभागी व्हावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी केले.
भारतीय कृषी क्षेत्रातील श्रमकारी शेतमजूर, भूमिहीन, शेतकरी हा प्रमुखाने शेती व्यवसायाची संपूर्ण श्रमाची जबाबदारी हजारो वर्षांपासून आजपर्यंत याच समूहावर आहे.
तंञज्ञानाने शेती व्यवसायात यांञिक अवजारे आलेले असल्यामुळे मजुरदार बेकार होत आहे. २०२१-२२ चा अर्थसंकल्प असे निर्देश देते कि सरकारने मनरेगा बंद करण्याची जनुघोषणाच केली आहे.
कास्त करणार्या शेतकर्यांना जमिनीची मालकी देण्यासाठी आणि शेती व्यवसायात भुसुधार धोरणाचा अंमल करण्यासाठी आदिवासी डाव्या जनसंघटनानी जमीनदारी जनआंदोलन केल्यामुळे
कसे त्यांची जमीन कुळ कायदा, कमाल जमीन धारणा कायदा( सिलिंग कायदा) सरकारी, गायरान, वनजमीन, मधुरा जमीन, गावठाण
जमीन, बे -वारस जमीन,सरकारी काळात करणार्या भूमिहीन शेतकर्यांच्या नावे जमिनीचा पट्टा देण्याचे शासन निर्णय अनेक वेळा झाले
पण जमीन हक्काच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी केलेली नाही. व जमिनीचा ताबा दिला गेला नाही .
जमिनीची मालकी हक्काची नोंद करण्या ऐवजी कास्तकारानाच जंगल व महसुल प्रशासनाने हाकलून लावण्याचा सपाटाच लावला आहे.
जसा आदिवासी दलित आणि भटक्या भूमिहीन शेतमजूर शेतकरी समाज आपल्या हक्कापासुन वंचित आहे.
त्याच प्रमाणे दिव्यांग बाधव देखिल कष्टमय अनेक यातना सहन करत आहे.शासनाची तुटपुंजी मदत दिव्यांगाना जगण्यास पुरेशी नाहि व तो दुसर्यावर अवलंबुन
न राहाता तो स्वलंबि व्हावे म्हणून दिव्यांगाना शासकिय जमीन पाच एकर शासनामार्फत मिळावी म्हणून संघटितपणे संघर्ष करण्यासाठी
दिव्यांग,आदिवासी, भूमिहीन, शेतमजूर यांनी आदिवासी जंगल अधिकार जमीन हक्क
परिषदेत हजाराच्या संख्येची सामिल व्हावे असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ
महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, अखिल भारतीय किसान
मजदूर सभा केंद्रीय सचिव काँ. अशोक घायाळे, पि डि. वासमकर, ज्ञानेश्वर नवले, रंगनाथ
भालेराव, राजाभाऊ शेरकुरवार, संजय श्रीमणवार, प्रेमाने चव्हाण, वसंतराव पाटिल,
राहुल सोनुले, तुकाराम तांडेलवार, अंकुश खिलारे, बाला जनगेनवाड, अर्चणा शिंदे, कोमल