प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुखपदी किनवट टुडेचे मुख्य संपादक आनंद भालेराव यांची निवड
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुखपदी किनवट टुडेचे मुख्य
संपादक व दैनिक साहित्य सम्राटचे पत्रकार आनंद नारायण भालेराव* यांची निवड करण्यात आली आहे.
आनंद भालेराव गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध
पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.
आनंद भालेराव संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार
असून संघाची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर,
राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे,
राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, क्राईम राज्य प्रमुख नफीस शेख, चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रमुख दिग्दर्शक प्रशांत विलनकर, राज्य
उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे,
राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले,
शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील,
कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा महिलाध्यक्षा किरण जाधव, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलानी,
मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबीकर, मराठवाडा महिलाध्यक्षा वैशाली हिंगोले,
नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार,
जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या एकमताने दि.31/12/2021 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे.