Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील वाघ, धडाडीचा कार्यकर्ता आणि शेकडो कार्यकर्ते आपले कुटुंबीय म्हणून त्यांची काळजी घेणारा


नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील वाघ, धडाडीचा कार्यकर्ता आणि शेकडो कार्यकर्ते आपले कुटुंबीय म्हणून त्यांची काळजी घेणारा माणूस! 


राजकारणात वावरणारी खूप कमी माणसं 

कार्यकर्त्यांची अशी काळजी घेतात!
पण हा वाघ कशाचीच पर्वा न करता कार्यकर्ते,माणसं जपत आला आहे. 


राजकारणात क्षणिक लाभापायी लोक जवळ येतात आणि दुरावतातही!
पण या वाघाने जवळ आलेल्यांची आणि 

दुरावलेल्यांचीही सारखीच काळजी घेतली!
किनवटमधले अनेक कार्यकर्ते त्याची साक्ष देतील!

आज आंबेडकरी चळवळ मोडीत काढण्याचे नियोजनबद्ध कारस्थान सुरू असताना 

विनोदसारख्या निधड्या छातीच्या कार्यकर्त्यांची पदोपदी जाणीव होते आणि खेदानेच सांगायचे तर उणीवही भासते!


खऱ्या दलित पँथरचे पँथर म्हणायचे तेव्हा ' 
ना जिने की पर्वा 
ना मरने का डर


पँथर का सीना फाडकर देखो तो
नाम आएगा आम्बेडकर!'

विनोद हा हाडाचा पँथर!
आज विनोदचा वाढदिवस!
मनस्वी शुभेच्छा!