Ticker

6/recent/ticker-posts

महेद्र नरवाडे लिखित 'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' पुस्तकाचे रविवारी प्रकाशन


महेद्र नरवाडे लिखित 'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' पुस्तकाचे रविवारी प्रकाशन


किनवट ( तालुका प्रतिनिधी ) : मातोश्री रमाई जयंती निमित्त महेंद्र नरवाडे यांच्या 'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' 

या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार (दि.२१फेब्रुवारी ) रोजी 

मातोश्री कमलताई ठमके सभागृह, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा येथे आयोजित केला आहे . 



 भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवटचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली आणि परभणी येथील 

प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.आनंद इंजेगावकर व  अ.भा.बौद्ध उपासक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा 

औरंगाबादच्या कौशल्य प्रकाशनचे प्रकाशक डॉ.अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.पंजाब शेरे व सुत्रसंचालन उत्तम कानिंदे करतील.  रमेश मुनेश्वर आभार मानतील. 

    

  महाकवि वामनदादा कर्डक यांच्यापासून ते आजचे भीमशाहीर यांच्या जीवनकार्याचा आलेख असलेल्या महेंद्र नरवाडे यांच्या 'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' 

या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास बहुसंख्येनं उपस्थित राहावे, 

असे आवाहन सुरेश पाटील, रुपेश मुनेश्वर, सुजाता नरवाडे, 

प्रशांत दुथडे, प्रा.लक्ष्मीकांत दुथडे, अभि.शशिकांत नरवाडे, डॉ.प्रकाश रायघोळ, डॉ.प्रेमलता नरवाडे, तुषार नरवाडे यांनी केले आहे.