किनवटमध्ये आज पाच बाधित आढळले
किनवट / तालुका प्रतिनिधी : शुक्रवार (दि.. 26फेब्रुवारी)
रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार आज 31 व्यक्तींची एँटिजेन तपासणी केली.
त्यापैकी पाच जण बाधित आढळले.
बाधितांमध्ये एस. व्ही.एम. कॉलनी येथील 50 वर्षाची 1 महिला, 56 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 15 वर्षाचा 1 मुलगा, मांडवा येथील 60 वर्षाचा 1 पुरुष व दहेली येथील 29 वर्षे वयाचा 1 पुरुष अशा 5 जणांचा समावेश आहे. बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर,
उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 19, व होम क्वारंटाईन 33 अशा एकूण 52 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या,
असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल
आरटीपीसीआर टेस्ट,
आज घेतलेले स्वॅब - 50,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 50,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,
ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट- 31,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 5,
निगेटिव्ह अहवाल- 26,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 5,
आज मृत्यू - 0,