Ticker

6/recent/ticker-posts

मध्यरात्रीच्या सुमारास विशाल वर वाघाने केला हल्ला... इस्लापूर पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मथुरानगर जेवली येथील घटना


मध्यरात्रीच्या सुमारास विशाल वर वाघाने केला हल्ला...
 इस्लापूर पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मथुरानगर जेवली येथील घटना...

विदर्भातील मथुरा नगर जेवली येथील रहिवाशी 


विशाल विजय ब्राह्मण वय दहा वर्षे या मुलावर दिनांक 4 फेब्रुवारी 2021 रात्री 2 वाजताच्या सुमारास गाड झोपेमध्ये असताना वाघाने या युवकावर हल्ला केला 

सुदैवाने या युवकाचा जीव वाचला या घटनेमुळे मथुरा नगर येथील जनता भयभीत झाली आहे.

 वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला प्रथम उपचारासाठी गावातील 

नागरिकांनी ताबडतोब सोनदाबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले प्रथम उपचार करून 

पुढील उपचारासाठी उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.


यापूर्वी या गावातील नागरिकावर वाघाने हल्ला केला होता 

गावातील नागरिकांना वाघापासून फार्म मोठा धोका निर्माण झाला असून या सर्व प्रकाराची दखल  प्रशासनाने घ्यावी व विशाल ला आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे.

 वन विभागाने मथुरा नगर परिसरातील भटकंती करणाऱ्या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.