Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्याल्या जिल्हय़ाच्या दर्जा द्या, नाहीतर तेलंगाना मध्ये समाविष्ट करा, या साठी "४५" नवीन गावात शाखेची अनावरण करण्यात आले...............दिलीप धरमसिंग नाईक_


किनवट तालुक्याल्या जिल्हय़ाच्या दर्जा द्या, नाहीतर तेलंगाना मध्ये समाविष्ट करा, या साठी "४५" नवीन गावात शाखेची अनावरण करण्यात आले


दिलीप धरमसिंग नाईक_ 


तेलंगाना समितीचे अध्यक्ष _मा. विठ्ठल नाईक साहेब_ आणि सचिव _दिलीप धरमसिंग नाईक_ यांनी या आधी *२५ गावामध्ये* तेलंगाना समितीचे स्थापना करण्यात आली.

 यात किनवट /माहूर तालुक्यातील गावाचा समावेश आहे 

ज्यात आणिक *"४५"*  नवीन *गावात* समिती ने नवीन शाखा स्थापना करण्यात आली आहे. 
 
ज्यात नवीन गावं खालील प्रमाणे
 लखमापुर , तादुळा तांडा, मोहपुर, बोरगाव, घोटी, कमठाला,


वानोळा, पानोळा, पालाईगुडा, चोरड मंळी तांडा, जुनापानी, शेखफरिद वझरा,गौरी ,

बामन गुडा, सिखधानोरा, देवला नाईक तांडा,आंदबोरी (चि), चिखली(बु), मलकवाडी, टिंगणवाडी , 

शनीवारपेठ, मदनापुर ,येन्दा, पार्डी, बोधडी(खु) , सिंदगी, रामपुर पोतारेड्डी, इंजेगाव, सुंगागुडा , धानोरा, सावरगाव , 

जलधरा, तोटंमबा, सिवनी, परोटी, चंदपुर , गोंडेमहागाव, कंचली, दुर्गानगर , आंदबोरी (सी), अप्पारापेठ, दयाल धानोरा,बैलोरी , मांडवा,


अशा प्रकारे यात नवीन गावाचा समावेश आहे. 

पुढे बोलताना सचिव दिलीप नाईक यांनी सांगितले की, आज पण काही गाव विकासा पासून कोसो दूर आहे.

 जसे की काही गावाला आज पण दळण - वळण करण्यासाठी रस्ते,वीज,आरोग्य आणि _पाण्याचा प्रश्न_पण मोठ्या प्रमाणात गंभीर समस्या आहे. 

ज्यात रामपूर,सेवा दासनगर अशे गाव समाविष्ट आहे. 

अशी बाजू पण समितीचे सचिव दिलीप धरमसिंग नाईक यांनी वक्त केली. 
 

*किनवट/माहुर तालुका आदिवासी आणि डोंगराळ भाग* म्हणुन बहाल असून पण विकासाच्या दृष्टीने खूप कोसो दूर आहे.

 ईतर _मागासवर्गीय वर्ग_ आणि _खेडे, वाडी, गाव, तांडा_ याचा विकास कसा होईल. हा पण एक मोठा प्रश्न आहे. 

पुढे बोलताना ज्या ज्या गावामधे शाखेची अनावरण करण्यात आले, तेथे  जनतेकडून *"जनकोल "*

 चा पण विचार करता, किनवट /माहूर तालुक्यातील सुमारे *"१,०७,०८२"*
 ( एक लाख सात हजार ब्यानशी_ ) जनतेनि जनकोल ला सहमती दर्शविली आहे

समितीचे एकच धोरण आहे की, एक तर किनवट तालुका *जिल्हा* म्हणून बहाल करावा नाहीतर, *तेलंगाना* मध्ये समाविष्ट करा

आपल्या राज्यात महायुतीचे सरकार याच्यावर योग्य तो मार्ग काडून जनतेची, 

आणि तालुक्याची योग्य ते विकास करण्या बाबतीत, विचार करण्याची गरज आहे. 

या साठी समितीचे *अध्यक्ष मा. विठ्ठल नाईक साहेब आणि समितीचे सचिव दिलीप धरमसिंग नाईक आणि समितीचे ईतर पदाधिकारी*, यांच्या कडून *महामहिम राष्ट्रपति* 

 याना पत्राद्वारे लेखी देण्यात आले. 

आणि लवकरच *महामहिम राष्ट्रपति* यांची पण भेट घेण्यात येईल अशी माहिती

 सचिव दिलीप नाईक यांनी बोलून दाखविली.. 
आणि त्या साठी प्रयत्न पण चालू आहे.

 समितीची एकच मागणी आहे की,एक तर *किनवट तालुक्यातल्या जिल्हा चा दर्जा द्या, नाहीतर तेलंगाना मध्ये समाविष्ट करा* 

अशी मागणी समितीचे अध्यक्ष मा. विठ्ठल नाईक साहेब आणि सचिव दिलीप धरमसिंग नाईक यांनी वक्त केली आहे.........