नांदेड -मुंबई विमानसेवा दररोज ; खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
----------------------------------------------------------
किनवट/माहूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी करण्यात आलेली नांदेड -मुंबई विमानसेवा आता दररोज सुरु राहणार
असून याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे
सातत्याने पाठपुरावा करून मागणी केली होती त्या मागणीला यश आले असून आता
नांदेड सह आजूबाजूच्या ६ जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई विमानसेवेची व्यवस्था होणार आहे . २ मार्चपासून या विमानसेवेचा सुरवात जळगाव आणि अहमदाबाद मार्गे होणार आहे .
शीख धर्मियांचे पवित्र ठिकाण म्हणून नांदेड जगभर परिचित आहे. त्यामुळे जगभरातून भाविक नांदेड मध्ये दर्शनासाठी येत असतात. रेल्वे सोबतच
विमानसेवा सुद्धा परिपूर्ण असावी याकरिता नांदेड मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे विमानतळ तयार करण्यात आले आहे .
याठिकाणी रात्री सुद्धा विमान ये -जा करण्याची सूविधा आहे . खासदार हेमंत पाटील यांनी यापूर्वी सुद्धा
नांदेड येथील विमानतळावरून दिल्ली - नांदेड - अमृतसर विमानसेवा, आणि मालवाहक विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन मागणी केली होती.
त्यांनतर सुरु झालेली विमानसेवा मध्यंतरी देशात आलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शिथिल करण्यात आली होती
कालांतराने सर्व सेवा पूर्ववत झाल्यांवर नांदेड,हैद्राबाद,नागपूर आदी ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात आली.
मुंबईकरिता सुद्धा आठवड्यातून मंगळवार, बुधवार, आणि गुरुवार या दिवशी सेवा सुरु होती .
परंतु नांदेड मधील हवाई प्रवाशांची संख्या लक्षात घेता. मुंबईला जाण्यासाठी दररोज विमानसेवा असावी या मागणीकरिता खासदार हेमंत पाटील आग्रही होते .
याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर आता मुंबई करिता आठवड्यातील उर्वरित सोमवार , शुक्रवार, शनिवार, व रविवार या चार दिवशी विमानसेवा सुरू करण्यात आली.
येत्या २ मार्च पासून या सेवेचा शुभारंभ होणार असून सोबत जळगाव आणि अहमदाबाद मार्गे प्रवास करता येणार आहे .
देशभरात सुसज्ज विमानसेवा देणारी ट्रूटेज हि कंपनीचं आठवाड्यातील पुढील चार दिवस विमानसेवा देणार आहे .
सकाळी ९. ४५ वाजता अहमदाबाहून विमान निघून जळगावला
११. ५ मिनिटांला पोहचेल ११. ३० मिनिटांनी जळगावहून निघून १२. ४५ मिनिटांनी मुंबईला पोहचेल मुंबईहून १. २५ मिनिटांनी निघालेले हे
विमान नांदेड येथे ३. ०० वाजता येईल नांदेड येथून ३. ३० मिनिटांनी हे विमान मुंबईकडे रवाना होईल मुंबई विमानतळावर ५ वाजता पोहोचून ५. ३० वाजता जळगावकडे
उड्डाण करेल ७.०५ वाजता जळगावहून निघून रात्री ८. २५ मिनिटांनी अहमदाबाद येथे पोहचेल. या विमानसेवेमुळे नांदेडसह हिंगोली ,