किनवट/प्रतिनिधी— एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्पाधिका-यांनी "अमृत आहार" योजनेतील स्तनदामातांना वाटप करणा-या एजंसीजचा घोडेबाजार थांबवावा.
महिला बचत गटांमार्फतच तालुकाभर आहार दिला जातो काय ?,
गोकुंदा येथिल एका अंगनवाडीला शासनाचे निर्देश शिथील करुन उर्वरीत अंगनवाड्या बचतगटांना जोडल्या आहेत.
शिवाय लाभार्थ्यांना अमृत आहाराची थेट रक्कम देण्याची व्यवस्था करावी,
अशा मागणीचे निवेदन वरिष्ठांकडे पाठवले आहे.
कुपोषन निर्मूलनासाठी शासन स्तरावर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. प्रारंभी अंगनवाडी सेविकांच्या माध्यमातून आहार पुरवठा केला होता
त्यावेळी त्यात भ्रष्टाचार झाल्याची वल्गना करण्यात येऊन अंगनवाडी सेविकांकडून होणारे वाटप बंद करण्यात आले.
बचतगटांमार्फतच लाभार्थ्यांना आहार पुरवठा करण्याचे शासन निर्देश देण्यात आले.
तालुकाभर त्या निर्देशाचे प्रकल्पाधिका-यांनी पालन केले
काय ? तर त्याचे उत्तर म्हणजे प्रकल्पाधिका-याच्या भ्रष्टाचारामुळे शासन निर्देशाला ठेंगा दाखवण्यात आला आहे.
सैराट सुटलेल्या या अधिका-यावर कार्यवाही झालीच पाहिजे.
गोकुंदा येथिल एक अंगनवाडी वगळता उर्वरीत सर्व अंगनवाड्या बचतगटांना जोडल्या आहेत.
याच अंगनवाडीसाठी निर्देश शिथील करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
प्रकल्पाधिका-यांनी कारण स्पष्ट करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
किनवट येथिल वादग्रस्त बालविकास प्रकल्पाधिकारी यांच्या काळात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.
छुप्या मार्गाने मिनी अंगनवाडी भरती करण्यात हा अधिकारी तरबेज आहे.
कसलीही वाच्चता न होऊ देता लाखोंची उलाढाल केली जाते.
बचतगटांना आर्थीकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा शासनाचा मानस असल्यामुळे अंगनवाड्यांच्या अमृत आहाराचे काम देखिल त्यांना देण्याचे निर्देश असतांनासुद्धा त्यातही हेवेदावे करुन कामे देण्यात आलीत.
यात ग्रामपंचायतीनेही ग्रामसभेला बग्गल देऊन ठराव दिल्याचे समजते.
गोकुंद्यात जेवढे इच्छूक बचतगट आहेत त्यांना विभागून कामे देण्याची ग्रामपंचायतीला गरज वाटली नाही.
शासकीय कामकाजातही राजकारण आडवे करुन प्रकल्पाधिकारी खेळी खेळत असतील,
बचतगट प्रामाणिकपणे वाटपाचे काम करीत असेल तर एक खुल्ली सोडलेली अंगनवाडी देखिल बचतगटाला जोडण्यात यावे
अन्यथा लाभार्थ्यांना थेट रक्कमेचेच वाटप करण्याची व्यवस्था करावी.