राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने कोठारी ची ,मांडवी व इस्लापूर येथे चक्काजाम आंदोलन संपन्न
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात दोन्ही सभागृहात दिनांक 05/06/2020 रोजी कृषी कायदा पास करून भारतातील शेतकऱ्यावर थोपन्यात आल्याच्या विरोधात दिल्ली
येथे 70 दिवसापासून संयुक्त किसान मजदूर मोर्चा द्वारे चालू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास राष्ट्रीय संयोजक मा वामन मेश्राम
यांच्या आदेशाने संपूर्ण भारतातील 550 जिल्हे व सर्व तालुक्यावर गाव पातळीवर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने
केंद्रातील भाजपा सरकारने भारतातील शेतकरी संघटनेला विचारात न घेता दिनांक 05/06/2020 रोजी शेतकरी विरोधात दोन्ही सभागृहात कृषी बिल कायदा पास करून घेतला
यानंतर देशातील 550 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने राष्ट्रपती महोदयांना टप्प्याटप्प्याने निवेदने सादर करण्यात आली होती
यानंतर आंदोलनाचे रूपांतर खासदार व आमदार यांचे विरोधात पुतळा जलावा आंदोलन झाले होते
यासह भारतातील सर्व शेतकरी संघटना यांना वामन मेश्राम राष्ट्रीय संयोजक यांनी कृषि बिल कसे शेतकरी बांधवांना घातक आहे याबाबतीत बैठका घेऊन चर्चा करण्यात येऊन
दिल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चा द्वारे घेण्यात आला त्यानुसार दिल्ली येथे धरणे आंदोलन 70 दिवसापासून सुरू आहे
शेतकरी आंदोलना समोर केंद्र सरकारने अनेकदा चर्चा घडून आणली होती
परंतु मार्ग निघत नसल्याने व शेतकऱ्यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी
ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतल्याने त्या ट्रॅक्टर रॅलीला गालबोट लावण्यासाठी
भाजपा सरकारने त्यांचे समर्थक व त्यांचे कार्यकर्ते यांना रॅलीत घुसून धिंगाणा घातला होता
व त्याचा परिणाम म्हणून शेतकरी हिंसक झाले असा आव भाजपा सरकारने काढला होता खरे-खोटे जनते समोर आल्याने भाजपा सरकार अधिकच अडचणीत आली आहे
तरीपण सरकार कृषी बिल वापस घेण्याच्या मनस्थितीत नसून जून 2020 नंतर पासून देशांमध्ये सर्व स्तरावर आर्थिक मंदी आल्याचेचित्र सुद्धा दिसत आहे
या सर्व बाबीवर मा वामन मेश्राम यांनी दिल्लीमध्ये चालू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलन हे समस्त भारतवासी यांचे आंदोलन व्हावे या दृष्टीने राष्ट्रीय
किसान मोर्चाच्या वतीने कार्यकर्त्यांना गावागावांमध्ये कृषी बिल समजून सांगून आंदोलनासाठी तयार केल्याने व त्याचाच एक
भाग किनवट सारख्या डोंगराळ भागातील कोठारी ची ,मांडवी व इस्लापूर येथे शेतकर्याच्या समर्थनात चक्का जाम आंदोलन करण्यात आले
आंदोलन करत असताना कोठारी ची येथील आंदोलन करते यांना किनवट पोलिसांनी अटक करत पोलीस व्हॅन मध्ये डांबून किनवट ठाणे येथे घेऊन गेले
यामध्ये संयोजक संतोष आडकिने, गोविंदराव बोडके, शेख मेहबूब, शेख शब्बीर,
शेख मुनीर, विजय वाघमारे, व संतोष साळवे यांच्यासह इतर वीस ते पंचवीस कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता