Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती विविध उपक्रमानी साजरी करून अभिवादन


किनवट शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती विविध उपक्रमानी साजरी करून अभिवादन


(शहर प्रतिनिधी किनवट) :


कुळवाडी भुषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जंयती किनवट मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .


सुरवातीला सकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक उत्सव समिती तर्फे छ.शिवाजी चौक , 

डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक, जिजामाता चौक, ते गोकुंदा पर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली त्या नंतर जुन्या 

नगर पालीकेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, रंग भरण स्पर्धा, भाषण स्पर्धा, भव्य आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, व नेत्र तपासणी शिबिर 

असे विविध उपक्रम कोवीड१९ चे नियम पाळुन  घेण्यात आले व छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले 

यावेळी आमदार भिमरावजी केराम, नगराध्यक्ष आंनद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार, 

श्रीनिवास नेमान्नीवार, व्यंकट नेमान्नीवार,कैलास भगत, अभय महाजन, साजीद खान, अनुसया  मधुकर 

अन्नेलवार, जहीराद्दीन खान, प्रशांत कोरडवार, सागर ताई शिंदे, बापुसाहेब तुप्पेकर, अण्णा भाऊ 

शेळके, किरण ठाकरे,डॉ . अरवींद भुरके, डॉ. बालाजी तेलंग, डॉ. प्रसाद सुर्वे, डॉ. वसंत बामणे, 

डॉ. अविनाश पवार, सतिश सोरटे, डॉ. सतिष सोरटे, डॉ. रीतेश सुर्यवंशी, डॉ . सुधाकर तहाडे यांच्या तर्फे मोफत तपासणी करण्यात आली

 व ओमकार ऑप्टीकल तर्फे  केवळ २५० चष्मा बनवुन घेण्याची मुभा देण्यात आली.
संयोजन समितीचे गोवींद आरसोड, कार्याध्यक्ष, 

प्रा. दगडु भरकड, स्वागताध्यक्ष, उमाकांत कराळे,संतोष डोणगे पाटील , राजु शिंदे, ज्ञानेश्वर कदम , राजु सुरोशे आदींनी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.