Ticker

6/recent/ticker-posts

सन्माननीय नामदार संजयभाऊ राठोड,शिवसेनेचा व समस्त बंजारा समाजाचा 'ढाण्या वाघ' दिवसेंदिवस तुमच्या बद्दल विरोधकांकडून रचण्यात येणाऱ्या षडयंत्रामुळे मनोबल खचू देऊ नका.


जनताजनार्दन व संजुभाऊस.....

जय हिंद ! जय सेवालाल !! जय महाराष्ट्र !!! जय बंजारा !!!!

सन्माननीय नामदार संजयभाऊ राठोड,शिवसेनेचा व समस्त बंजारा समाजाचा 'ढाण्या वाघ' दिवसेंदिवस तुमच्या बद्दल विरोधकांकडून रचण्यात येणाऱ्या षडयंत्रामुळे मनोबल खचू देऊ नका.

मी व माझ्या सारख्याच बंजारा समाजातील तमाम तुमच्या चाहत्यांचा तुम्हाला खंबीरपणे पाठींबा आहे.

विधानसभेच्या पाच पंचवार्षिक निवडणुकीच्या विजयी निकालाचा चढता आलेख विरोधकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे.त्यांना कळून चुकले आहे की,

पुढील कित्येक निवडणुकीच्या पंचवार्षिक योजनेत या ढाण्या वाघाचा आपण पराभव करू शकणार नाही.म्हणुनच विरोधक जिवाचा आटापिटा करुन ही थर्ड क्लास प्लॅनिंग यशस्वी करण्यासाठी एकटलेले आहेत.

होऊशकते की,अनवधानाने तुमच्या पासून दुरावलेल्यांना सुद्धा विरोधकांनी हाताशी पकडले असतील म्हणूनच दिवसेंदिवस त्यांचा बळ वाढतांना दिसतंय.पण काळजी करू नका सेवालाल महाराजांचा व आदरणीय बाळासाहेब या शिवसेना प्रमुखांचा तुम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे.

आजपर्यंत तुम्ही कित्येक अडी-अडचणी व संकटाचा खंबीरपणे सामना केला आहे.हे संकट सुद्धा तुमची परीक्षा पाहण्यासाठी ऊभे ठाकले आहे.परीक्षा तुमची आहे परंतु येथे परीक्षार्थी समस्त बंजारा समाज आहे.तुमच्या सारख्या 

नेत्रदीपक सामाजिक व राजकीय नेतृत्वाला समाज सहजा सहजी संपुष्टात येऊ तर देणार नाहीच शिवाय समाजाची सामाजिक व राजकीय अधोगती सुद्धा होऊ देणार नाही.

कारण बंजारा समाजसेवकांसोबतच अन्य समजातील सामाजिक कार्यकर्ते कायम तुमच्या सोबत राहतात हे तुमच्या पाचही निवडणुकीच्या विजयी निकालाद्वारे सर्वांमुखी आहे.

 सत्य-असत्य काही असो मात्र बंजारा समाज आज इकडे आड,तिकडे विहीर अशा संकटात सापडलेला आहे.

स्वर्गीय पूजा चव्हाण या बंजारा कन्येसह तिच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होणे ही निश्चितच आमची सामाजिक बांधिलकी आहे 

आणि ती असणारच.असे पाहता दोन्हीं बाजूंनी बंजारा समाजाचेचं नामोल्लेख होत आहे.

म्हणुनच मी याद्वारे आपणास नम्र निवेदन वजा विनंती करतो की उलट-सुलट चर्चा नकरता आपण

 सर्व बंजारा समाजासह इतर बंधू आणि भगिनींनो हा विषय नीट आकलन करूया आणि संकटात सापडलेल्या नेतृत्वाच्या सोबत आणि अशा 

प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहूया.
आपल्यातिलच एक समाजसेवक :
श्री.सी.के. पवार.( बंजारा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक)