Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि ०८ बंजारा समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या पुतळा शहरातील साई नगर येथिल बाल उद्यांनात उभारण्यात यावा व त्याकरिता येत्या १५ फेब्रुवारी


किनवट ता.प्र दि ०८ बंजारा समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या पुतळा शहरातील साई नगर येथिल बाल उद्यांनात उभारण्यात यावा व त्याकरिता येत्या १५ फेब्रुवारी 

रोजी साजरी होणा-या जयंती पुर्वी नगर परिषदेत विशेष सभेचे आयोजन करुन तसा ठराव पारीत करुन घ्यावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी 

कॉग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नगरसेवक व गटनेते जहिरोद्दीन खान यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कडे सादर केले आहे.
     

  किनवट तालुका हा बंजारा बहुल तालुका असुन येथे संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांना माननारा व श्रध्दास्थान असलेल्या वर्ग मोठ्या प्रमाणात आहे

 तर तालुक्यात सध्या संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे 

तर त्यांच अणुषंगाने किनवट शहरातील साई नगर येथिल सुंदर बाल उद्यान नगर परिषदेकडुन उभारण्यात आलेले आहे

 त्याच उद्यानात संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या पुतळयाची स्थापना करण्यात यावी यासाठी नगर परिषदेने विशेष सभेचे आयोजन 

करुन ठराव पारीत करावे अशा आशयाचे निवेदन गटनेते झहिरोद्दीन खान यांनी दिले आहे.
     

  याकडे किनवट नगर परिषदेतील नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी हे कशा प्रकारे 

पाहतात याकडे संत सेवालाल महाराज यांच्या अणुयायांचे लक्ष लागले आहे.