Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय संजयजी राठोड यांच्या समर्थनार्थ हिंगोली येथे हजारो शिवसैनिक व बंजारा समाज बांधव उतरले रस्त्यावर


महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय संजयजी राठोड यांच्या समर्थनार्थ हिंगोली येथे हजारो शिवसैनिक व बंजारा समाज बांधव उतरले रस्त्यावर 

महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय नामदार संजयजी राठोड

यांच्यावर करण्यात येत असलेल्या खोट्या आरोपाच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा शिवसेना व जिल्ह्यातील हजारो बंजारा समाज बांधवांच्या वतीने

जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मागील काही दिवसापासून माननीय *संजयजी राठोड यांच्यावर


 एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणी बीजेपीच्या काही नेत्यांकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहे सदर प्रकरणी माननीय संजयजी राठोड यांचा कुठलाही संबंध नसताना विरोधक त्यांना खोट्या व काल्पनिक गोष्टी आधारे त्यांना

 या आत्महत्येप्रकरणी विनाकारण बदनाम करून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न* करीत आहेत *पीडित मुलीचे नाव घेता येत नसतानाही हे बीजेपीचे पाताळ 

लोक बंजारा समाजाच्या मुलीची व संजय भाऊंची विनाकारण बदनामी करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे केविलवाणा प्रयत्न करीत आहेत* 

अशा नाहक बदनामी करणारे विरोधकांवर कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी व माननीय संजय भाऊ राठोड यांना समर्थन देण्यासाठी 

आज हिंगोली येथे हजारोच्या संख्येने बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरले हिंगोली 

शिवसेना जिल्हाप्रमुख* तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे 

लोकप्रिय आमदार संतोषरावजी बांगर साहेब यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील समस्त बंजारा बांधव आज एक वाटला* व मोठा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.