Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली येथे नव्याने स्थापन होणाऱ्या हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळाच्या हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची पहिली


हिंगोली येथे नव्याने स्थापन होणाऱ्या हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळाच्या हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची पहिली 

बैठक पुणे येथे माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  
                    या बैठकीत खालील महत्त्वाचा विषयांवर चर्चा करण्यात आली.
       
1. हळद उत्पादन च्या संदर्भात कोणते उद्योग उभारता येतील.

2.हळदी मध्ये कुरकुमीन चे प्रमाण वाढविण्यासाठी  दापोली,  राहुरी आणि परभणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन करून  नवीन जातीची निर्मिती  करणे 

3.कमी खर्चात हळदीचे जास्त उत्पादन घेण्यासाठी राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठावर संशोधन करण्याची जबाबदारी निश्चित करणे.

4. हळद प्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधने शेतकऱ्यांना अल्पखर्चात उपलब्ध  व्हावेत यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे.

5.हिंगोली जिल्ह्यातील हळद जास्तीत जास्त पर राज्य  पर देशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न करणे.

6.नवीन हळद बियाणांच्या जि.आय.(G.I.)  नामांकनासाठी कॉमर्स कमिटी व स्पाईस बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात येईल

7.जास्तीत जास्त  वाण जि. आय. नामांकनासाठी पाठवुन त्यांना नामांकन मिळवुन घेणे व असे वाण हळद लागवडीच्या हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणे.

8.  हळद  संशोधन बोर्डाचे मुख्य कार्यालय व स्पाईस बोर्डाचे उपकेंद्र हिंगोली येथे स्थापण करण्यात येणाऱ्या प्रस्तावाची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

9.देशाच्या ज्या राज्यात  हळदीचे मोठ्या प्रमाणात  उत्पादन होते अश्या भागात हळद उत्पादक शेतकरी व शास्त्रज्ञ यांचे अभ्यास दौरे आखण्यात येतील.