जलधरा येथील कैलास वासी माजी आमदार किशनराव पाचपुते यांचे सुपुत्र सुनील किशनराव पाचपुते वय 53 वर्षे या या युवकांनी त्यांच्या राहत्या घरातच सिलिंग फॅनला लायलोन दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्या ची
घटना दिनांक 30 मार्च 2021 रोजी सकाळी पाच वाजण्याच्या पूर्वी ही घटना उघडकीस आली आहे.
सुनिल किशनराव पाचपुते यांनी राहत्या घरात सिलिंग फॅन ला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना त्यांचे छोटे बंधू
तारकेश्वर किशनराव पाचपुते यांनी प्रथम पाहिले असता सदरील घटनेची माहिती इस्लापूर पोलीस स्टेशनला कळविल्याने इस्लापूर ठाण्यातील
एएसआय ए ए शेख व पोलीस कॉन्स्टेबल एन एस पांचाळ या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी
जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवून शवविच्छेदन करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सुनील किशनराव पाचपुते हा कुठल्यातरी गुन्ह्याखाली औरंगाबाद येथील हर्सूल जेल मध्ये तो शिक्षा भोगत होता
लॉकडांऊनमध्ये तो सुट्टीवर घराकडे आला होता अशी प्राथमिक माहिती त्यांच्या नातेवाईकानी दिली आहे.