किनवट ता.प्र दि ०१ बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे संत रविदास व कवि कुसमागृज यांची संयुक्तीक जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवराज बेंबरेकर होते
तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्रर्यवेक्षक प्रा अनिल पाटील, प्रा.डॉ आनंद
भालेराव, प्रा.डॉ अंबादास कांबळे, प्रा.विजय खुपसे, प्रा.डॉ पंजाब शेरे, प्रा.सुलोचना जाधव, प्रा.ज्ञानेश्वर चाटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संत रविदास व वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमागृजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले
त्यावेळी त्यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकतांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम
अधिकारी प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांनी सांगितले कि व्यक्ती ज्या समाजात जन्माला आला ते महत्वाचे नसुन त्यांचे कर्म कसे आहे
हे महत्वाचे आहे त्याकरिता मानवाने चांगले कार्य करावे असे आपल्या वाणीतुन संत रविदास
महाराज सांगतात त्यांचे नाव रविदास असुन महाराष्ट्रात रोहिदास या नावाने ओळखले जातात
तर देशात ते १६ नावावे ओळ्खले जातात संपुर्ण मानव जातीला मानवतेची शपत देणारे जगतगुरु, महान संत होते
तसेच ज्ञानपिठ पुरस्कार विजेते साहित्यीक कुसुमागृज यांच्या जन्मदिनाचे औचित्यावर साजरे होणारे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
मराठीला दुसरे ज्ञानपिठ पुरस्कार मिळवुन देणारे कुसुमागृह हे महानकवी व साहित्यीक होते
असे यावेळी बोलतांना प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांनी सांगितले.