कोरोनाच्या संकटातही किनवटमध्ये अवैध धंदे जोरात किनवट - कोरोनाच्या संकटातही शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, पत्यांचे क्लब या जुगारासह अवैध गुटखा,दारुविक्री व अवैध प्रवासी वाहतूक स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने जोरात सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंदे त्वरित बंद करावेत,अशी मागणी होत आहे. शहरासह ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरापासून लपून- छपून सुरु असलेला मटका आता गल्लीबोळातही राजरोसपणे सुरु आहे.
माहूर रस्त्यावरील पुलाखाली असलेल्या नाल्याजवळील एका शिवारात दिवसरात्र मटका,पत्यांचा क्लब उघडपणे सुरु असल्याच्या अनेक तक्रारी होऊनही या अवैध धंद्याकडे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष होत आहे.
सदर शिवारात दररोज शेकडो दुचाकी,ऑटो थांबूनही ही बाब पोलिसांच्या दृष्टीस पडत नाही.यामुळे मटका व क्लब चालकांचे मनोधैर्य वाढले असून,
आता भाजी मार्केट,शिवाजीनगर,एसव्हीएम परिसर,बेल्लोरी रोडसह इतर गल्लीबोळात मटका फोफावला आहे.पैनगंगा नदीकाठावर मटक्यासह पत्यांचा क्लब उघडपणे सुरु आहे.
बसस्थानकापासून अगदी जवळच्या अंतरावर सदर अवैध धंदे सुरू असताना एक फौजदार पार्किंगचे नियम सांगत ऑटोचालकांकडून दंडाच्या नावाखाली शंभर,पन्नास रुपये वसुलीत मग्न असतात.
याच ठिकाणी सारखणी,माहूर व इतरत्र जाणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या क्रम लावून उभ्या असतात.
परंतु याकडे पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.
शहरात वाढत्या अवैध जुगारासह सायंकाळच्या लॉकडाऊननंतर देशी, विदेशी दारूची अवैध विक्री होत आहे.
किनवट शहरासह सीमावर्ती इंजेगावातही मटका खुलेआम सुरू आहे.
बोधडी,सारखणीत मटका, क्लबसह अवैध गुटखा विक्री जोमाने सुरू आहे.
संबंधित बीट जमादारासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष आहे.अधूनमधून स्थानिक गुन्हे शाखेकडून मटका, क्लबवर जुजबी कारवाई होते. त्यानंतर पुन्हा अवैध धंदे धुमधडाक्यात सुरू होतात.
ठाण्यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ठाण मांडलेल्या काही कर्मचाऱ्यासह येथून बदली झाल्यानंतर वर्षभराच्या आतच ठाण्यात पुनरागमन केलेल्या
एका जमादारावर ' वसुली' ची जबाबदारी असल्याचे सांगण्यात येते.ठाण्यातंर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद करा,
अशी मागणी आमदार भीमराव केराम यांच्यासह अलीकडेच वंचित बहुजन आघाडीने केली.
परंतु अवैध धंदे कमी होण्याऐवजी कोरोनाच्या संकटातही जोरात सुरू आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नांदेडच्या धर्तीवर येथील अवैध धंदे चालविणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
किनवट - कोरोनाच्या संकटातही शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, पत्यांचे क्लब या
जुगारासह अवैध गुटखा,दारुविक्री व अवैध प्रवासी वाहतूक स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने जोरात सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंदे त्वरित बंद करावेत,अशी मागणी होत आहे. शहरासह ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरापासून लपून- छपून सुरु असलेला मटका आता गल्लीबोळातही राजरोसपणे सुरु आहे.
माहूर रस्त्यावरील पुलाखाली असलेल्या नाल्याजवळील एका शिवारात दिवसरात्र मटका,पत्यांचा क्लब उघडपणे सुरु असल्याच्या अनेक तक्रारी होऊनही या अवैध धंद्याकडे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष होत आहे.
सदर शिवारात दररोज शेकडो दुचाकी,ऑटो थांबूनही ही बाब पोलिसांच्या दृष्टीस पडत नाही.यामुळे मटका व क्लब चालकांचे मनोधैर्य वाढले असून, आता भाजी
मार्केट,शिवाजीनगर,एसव्हीएम परिसर,बेल्लोरी रोडसह इतर गल्लीबोळात मटका फोफावला आहे.पैनगंगा नदीकाठावर मटक्यासह पत्यांचा क्लब उघडपणे सुरु आहे.
बसस्थानकापासून अगदी जवळच्या अंतरावर सदर अवैध धंदे सुरू असताना एक फौजदार पार्किंगचे नियम सांगत ऑटोचालकांकडून दंडाच्या नावाखाली शंभर,पन्नास रुपये वसुलीत मग्न असतात.
याच ठिकाणी सारखणी,माहूर व इतरत्र जाणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या क्रम लावून उभ्या असतात.
परंतु याकडे पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.
शहरात वाढत्या अवैध जुगारासह सायंकाळच्या लॉकडाऊननंतर देशी, विदेशी दारूची अवैध विक्री होत आहे.
किनवट शहरासह सीमावर्ती इंजेगावातही मटका खुलेआम सुरू आहे.
बोधडी,सारखणीत मटका, क्लबसह अवैध गुटखा विक्री जोमाने सुरू आहे.
संबंधित बीट जमादारासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष आहे.
अधूनमधून स्थानिक गुन्हे शाखेकडून मटका, क्लबवर जुजबी कारवाई होते.
त्यानंतर पुन्हा अवैध धंदे धुमधडाक्यात सुरू होतात.
ठाण्यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ठाण मांडलेल्या काही कर्मचाऱ्यासह येथून बदली झाल्यानंतर वर्षभराच्या आतच ठाण्यात पुनरागमन केलेल्या एका जमादारावर
' वसुली' ची जबाबदारी असल्याचे सांगण्यात येते.ठाण्यातंर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद करा,
अशी मागणी आमदार भीमराव केराम यांच्यासह अलीकडेच वंचित बहुजन आघाडीने केली.
परंतु अवैध धंदे कमी होण्याऐवजी कोरोनाच्या संकटातही जोरात सुरू आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नांदेडच्या धर्तीवर येथील अवैध धंदे चालविणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करावी,